Mallkhamb Competition at Mumbai PTKS gets overwhelming response.

विलेपार्लेत विभागीय निमंत्रित मल्लखांब स्पर्धा संपन्न ..

विलेपार्ले (पूर्व) येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल येथे नुकत्याच झालेल्या आर.वाय.पी. निमंत्रित विभागीय मल्लखांब स्पर्धा मोठ्या दिमाखात पार पडल्या.या स्पर्धा संकुलाचे संस्थापक स्व. रमेश य. प्रभू यांच्या स्मृति प्रित्यर्थ आयोजित केल्या होत्या.स्पर्धा विभागीय असल्या मुळे क्रीडा संकुला सहित मुंबई शहर, उपनगर, ठाणे, डोंबिवली, कल्याण, नवी मुंबई, वसई, विरार व पालघर या विविध जिल्ह्यातील देखील एकूण २८ संघांचा सहभाग मिळाला.

मल्लखांब खेळातील पहिली अर्जुन पुरस्कार विजेती कु. हिमानी उत्तम परब, दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते उदय देशपांडे सर, संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू, संकुलाचे विश्वस्त राजू रावल, डॉ.मोहन राणे व मकरंद अडुळकर, जेष्ठ प्रशिक्षक महेश अटाळे सर या मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले व सर्वानी शपथ घेऊन स्पर्धेस सुरुवात झाली.पाहिल्या दिवशी स्पर्धा क्रमांक १. म्हणजे सांघिक विजेतेपदाच्या स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत महिलांच्या गटात श्री. पार्लेश्वर व्यायामशाळा ( विलेपार्ले) ४०.६० गुण मिळवून पहिल्या क्रमांकाचा मान मिळवला त्या पाठोपाठ श्री समर्थ व्यायाम मंदिर ( दादर) ४०.१० व सानेगुरुजी आरोग्य मंदिर ( सांताक्रूझ) ३९.०० गुण मिळवून क्रमाने दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांक पटकाविला.
पुरुषांच्या गटात श्री पार्लेश्वर व्यायामशाळेने ४३.१५ गुण मिळवून प्रथम क्रमांकपटकाविला दुसर्‍या क्रमांकावर सानेगुरुजी आरोग्य मंदिर ४०.४५ तर तिसर्‍या क्रमांकावर श्री समर्थ व्यायाम मंदिर ३९.२५ गुण प्राप्त करून समाधानी राहावे लागले.


स्पर्धा क्रमांक एक वरुन पहिल्या १० खेळाडूंची वैयक्तिक विजेते पदासाठी निवड झाली व दुसर्‍या दिवशी या स्पर्धा घेण्यात आल्या.
निकाल पुढीलप्रमाणे :
महिला :-१. अदिती करंबळेकर ( समर्थ)- ९.२५ २. जान्हवी जाधव ( पार्लेश्वर ) – ८.७५ ३. श्रुती  उतेकर ( दहिसर स्पोर्ट्स) – ८.७० ४. देवांशी पवार ( पार्लेश्वर ) – ८.६५ ५. रुपाली गंगावणे ( सुकाहारा) – ८.६५ ६. हृदया दळवी ( ऋतूराज स्पोर्ट्स) – ८.५०
पुरुष :- १) समर्थ राणे ( दहिसर स्पोर्ट्स)- ९.२० २) अक्षय तरळ ( पार्लेश्वर )- ९.१० ३) रिषभ घुबडे ( पार्लेश्वर )- ८.८० ४) तानाजी मांडवकर ( महात्मागांधी) – ८.७५ ५) मृगांक पाठारे (दहिसर विद्या मंदिर)- ८.७५ ६) शंतनु लोहार ( समर्थ) – ८.७५
या सर्व स्पर्धा महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेच्या व मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने पार पडल्या. स्पर्धेसाठी  राष्ट्रीय व राज्य स्तराचे अनुभवी पंचांच्या देखरेखीखाली स्पर्धा यशस्वी रित्या पार पडल्या. महाराष्ट्राचे तांत्रिक समिती सदस्य रवी गायकवाड यांच्या निरीक्षणाखाली स्पर्धा पार पडल्या तर मल्लखांब संघ अंधेरी चे सचिव गणेश देवरुखकर यांनी स्पर्धा प्रमुख या नात्याने आपली जबाबदारी पूर्ण केली.

SPORTSNASHA

www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.

Show Buttons
Hide Buttons