Seventeen not Seventy!

Seventeen not Seventy! Dwarkanath Sanzgiri- A relentless journey ….

सतरा वयाला लाजवणारी सत्तरी….
द्वारकानाथ संझगिरी एक असामी….

द्वारकानाथ संझगिरी हा नुसता लोकप्रिय लेखक नसून एक भन्नाट व्यक्तिमत्व आहे , त्याला खूप जवळून बघण्याचा योग आम्हाला स्पोर्टसनशा च्या अनेक कार्यक्रमांच्या निमित्तने आलाय हे आमचे (मी व माझा मित्र Rajesh Deo ) भाग्य.

द्वारकाचा मी घेतलेला (Sawant Sukhay Diwali Anka साठी) दिलखुलास इंटरव्ह्यू पुन्हा एकदा त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने…

जेव्हा त्याने मनाचे द्वार अलगद उघडले…

सचिन सुनील व अजित ह्या तीन महारथीनी आपल्या बॅट ने साऱ्या क्रिकेट विश्वावर पन्नास वर्षे राज्य केले किंबहुना तेवढेच राज्य द्वारकानाथ च्या लेखणीने मराठी क्रीडा क्षेत्रात केले असे म्हणायला हरकत नाही.

एक सुप्रसिद्ध लेखक, तीस पुस्तकांचा ऑथर, क्रीडा समीक्षक, टी व्ही क्रीडा विशेषज्ञ, क्रिकेट व चित्रपटावरचे दर्जेदार , मनोरंजक ऑडिओ व्हिज्युअल शो चा प्रस्तुतकर्ता , वृत्तपत्र मासिके इत्यादी माध्यमातून स्तम्भ लेखन , एक सामाजिक बांधिलकी जपणारा असामी आणि सध्या सोशल मीडियावर आपला खणखणीत ठसा ( सध्य काळात टॅटू) तरुणापासून ते जेष्ट ह्या सर्वांपर्यंत उमटावणारा ही द्वारकानाथची ओळख केवळ एक फॉर्मलिटी म्हणून मी देतोय.

“आम्हाला का सांगतोस हे ? सर्व आम्हाला माहीत आहेच. वेगळं काहीतरी बोल” अस तुम्ही मला बजाववण्याची शक्यता जास्त. म्हणूनच द्वारकाच्या मनातले जाणून घ्यायचा एक प्रयत्न खालील मुलाखतीतून. लहान तोंडी मोठा घास घ्यायची वाईट सवय मला आहे म्हणूनच काही कमी जास्त लिहिले असेल तर माफी असावी.

“कुठलाही मोठा प्लेयर हल्ली सहजासहजी कुठल्याही कार्यक्रमासाठी आणता येत नाही , त्यांचे मॅनेजर असतात. ते पैसे ठरवतात ..ती रक्कम तुला परवडणार नाही” शिवाजी पार्क च्या साईड ट्रॅक वर वॉक घेत असताना माझें डोळे द्वारकानाथ उघडत होता.

एका क्रिकेट विषयक पुस्तकाच्या प्रकाशनाला एखादा मोठा खेळाडू द्वारकानाथ आणू शकेल असे मला कुणीतरी सुचवले आणि मी द्वारकानाथ बरोबर इव्हनिंग वॉक भेट घेतली .

अर्थात ह्या सुप्रसिद्ध व लोकप्रिय व्यक्ती ला भीडण्याचे धाडस मी माझ्या स्वार्था साठी केले असले तरी त्यात एक एकसाईटमेंट होतीच, कारण द्वारका तशी मोठी हस्ती.

त्याच्याबरोबर त्याच्या स्पीड ने चालत असताना मी, ‘मोठा खेळाडू नाही आला तर निदान तू तरी ये , आणि पुस्तकाचं प्रकाशन कर’ असे वदवून घेतले . तिथे आमच्या मैत्री चा टॉस झाला.

त्या गोष्टीला आता पाच वर्षे लोटली पण काही ना काही प्रोग्रॅम च्या निमिताने पप्पू च्या (‘ मला पप्पू म्हण द्वारकानाथ नको’ असे एकदा त्याने प्रेमाने खडसावले आहे ) मी समपरकात राहिलो आणि खडूस, भाव खाऊ असा माझा त्यांच्याबद्दलचा गैरसमज पुसट होत गेला.

“आपण फोनवर बोलू आणि तू लिही.” नाबार्ड च्या पहिल्या दिवाळी अंकासाठी मित्र चिंतन मोकशीने ने जेव्हा मला विचारले तेव्हा मला पप्पू चे नाव पटकन सुचले. सध्या मराठी लिखाण करणारा व सोशल मीडिया च्या काळात सुद्धा जोरदार बॅटिंग करत स्वतःचे स्थान राखून ठेवणारा द्वारकानाथ खर तर गेल्या पाच दशकात विविध विषयांवर तुफान फटकेबाजी करतोय आणि ती लोकांना भिडतेय हे विशेष.

“मी बरेच वर्ष ‘मिड डे’ मध्ये लिहीत होतो पण तिथे त्या काळचा एक मोठा जर्नालिस्ट आला आणि त्याने माझी जागा घेतली, बरेचदा एडिटरलादेखील त्याच्या वृत्तपत्रात लिहिणारा एखादा लेखक लोकप्रिय होऊ लागला की पोटदुःखी लागते” तू इंग्रजी मधून मराठीकडे का वळलास ह्याचे कार्पोरेटी कारण त्याने सांगितले.

“सुनील गावस्कर च्या ओव्हल खेळी वर मी आर्टिकल लिहिले व ते खूप गाजले आणि तिथे माझी क्रिकेट लिखाणाची इंनिंग सुरू झाली” सुनील च्या त्या 221 च्या भन्नाट खेळी मुळे भले भारत जिंकला नाही पण द्वारकाने अनेक मने जिंकली आणि लेखक म्हणून आपले पाय रोवले.

“ह्याआधी म्हणजे सुरवातीच्या काळात, मी तसा सामाजिक आणि जात,पात, धर्म ह्यातील अतिरेक, इत्यादी विषयावर बंडखोर स्वभावी असल्यामुळे फुटकळ लिहीत होतो “

द्वारकानाथ अजूनही अधूनमधून त्याचा लेफ्टीस्ट स्वभाव माझ्याशी बोलताना, वाद घालताना दर्शवतो खरा . अर्थात मला त्याचा कधी राग आला नाही, कदाचित हा त्याच्या बोलण्याच्या शैली चा प्रभाव असावा.

तुझी अनेक पुस्तके प्रकाशित झाली पण ती सर्व तुझ्या लेखांचे संकलन अशीच आहेत, तुला कधी अमिश त्रिपाठी सारखे पाचशे पानी ऐतिहासिक ,जड पुस्तक लिहावेसे वाटले नाही का?” मी त्याला रॉन्ग वन टाकला.

” तू माझ्या दुखत्या नसे वर हात ठेवलास , खरच ही माझी एक अपुरी इचछा आहे. ह्या जन्मी पुरी होईल की नाही माहीत नाही , कारण अशी मोठी पुस्तके लिहिण्यासाठी जो फोकस लागतो, जे कौटुंबिक त्याग करावे लागतात त्याला खूप वेळ द्यावा लागतो . सध्या ते मला जमणार नाही असे वाटते ” टॅलेंटेड लेखकाला कधी तरी एखादा ट्रिगर लागतो आणि पुढे मागे त्याचे एखादे भारी ऐतिहासिक विषयक पुस्तक आल्यास मलाच (पप्पू ला यशस्वीपणे उचकवण्याबद्दल ) माझी पाठ थोपटायची संधी येईल ही माझी टिपिकल मध्यमवर्गीय अपेक्षा.

“महाभारतातील श्रीकृष्ण पुढची गोष्ट करताना मागली तिथेच सोडायचा, तस केलं तरच असे मोठे काम होऊ शकते . तस करणं कठीण असत रे आणि मला पोट आंहेच की! त्यासाठी वेळ द्यावा लागतो की! ” द्वारका लेखक असला तरी मल्टी टास्कर आहे आणि त्यापेक्षा जास्त प्रॅक्टिकल आहे हे तोदेखील मान्य करतोय इंडायरेकट्ट्ली.

” गो फॉर एक्सलन्स, मनी विल कम , हे प्रिन्सिपल जर तू फॉलो केलं असतस तर अजून जास्त यशस्वी झाला असतास का?” मी त्याच्यातील कर्तृत्ववान लेखकाला राजकुमार हिराणीचा डायलॉग ऐकवून आव्हान दिले.

” खर सांगू का ? मी ना एक्सलन्स कडे पोचलो ना पैसा कमावला” नम्रपणे उत्तर देताना (अनेक क्षेत्रात यश मिळवून सुद्धा) पप्पू ने मनातले एक शल्य व्यक्त केलं असावं कदाचित.

” पु ल देशपांडे एकदा त्यांच्या उतरवयात म्हणाले ‘ माझी प्रतिभा आता संपली, आता फक्त डोंगर दर्यात जाऊन फिरावेसे वाटते’ तस तुला कधी वाटते का?” मी चुकून त्याला त्याच्या उतारवयांत डोकावून बघायला सांगितले.

” माझी प्रतिभा , जी काय असेल ती ,मुळीच सपंली नाहीये आणि माझ्याकडे अजूनही भरपूर एनर्जी आहे. मला बरच काही करायचंय” आपल्याला द्वारकानाथच्या लिखाणाची मेजवानी अजून अनेक वर्षे उपभोगायला मिळणार हा दिलासा द्वारका ने दिला मात्र.

” तू डॉन ब्रॅडमन ला भेटलास आणि धन्य झाल्यास असे तू अनेक प्रोग्रॅम मध्ये सांगितलंस पण त्यातले खास असे काय होते?” त्या भेटीविषयी आगळे काय वाटले असे विचारताच

” शीअर लक ! अर्थात त्यासाठी मी भरपूर मेहनत घेतली हे आणि सहजा सहजी डॉन ची भेट मिळाली नाही हे सत्य “

महान डॉन ला भेटणे हे त्याची विकेट घेण्यापेकशा जास्त कठीण होत हेच त्याला सांगायचं असेल.

” मी अनेक साधारण टेलेंटेड लोक खूप पुढे गेलेले , पैशात लोळताना अनुभवले आहे. माझ्यावर लक्ष्मी म्हणावी तेवढी प्रसन्न झाली नाही . असो. तस बघितलं तर मी अनेक शारीरिक व्याधीन चा सामना केलाय आणि त्यातून बाहेर आलोय त्यामुळे कुठेतरी बॅलन्स झालय, माझ्याकडून काहीतरी घेऊन मला काहीतरी दिलंय दैवाने ” सडेतोड , स्पष्ट व मुद्देसूद बोलण्यास द्वारका चुकत नाही, कचरत नाही आणि त्यामुळेच तो मनाला भावतो .

“राजकपूर, दिलीप कुमार, देवा आनन्द वगैरे पूर्वी च्या लोकांनी फिल्म जगतात पाय रोवण्यासाठी भरपूर कष्ट घेतले पण पैशासाठी अनधिकृत मार्ग अवलंबले नाहीत . ‘मोगले आझम’ साठी शापुरजी पालनजी ने अधिकृतपणे पैसे दिले होते, पण आता मात्र बॉलिवूड मध्ये खूप पैसे विविध मार्गानी येतात , काही विशिष्ट घराण्यांचे राज्य चालते हे मान्य करावे लागेल” मी सध्या चाललेल्या नेपोटीझम विषया वर त्याचे मत विचारले आणि त्याने चटकन उदाहरणासहित दुजोरा दिला.

“एखाद्या जनहिताच्या कामासाठी काही लोक आपलं पूर्ण आयुष्य झोकून देतात, काही लोक त्यासाठी स्वतःची काही वर्षे देतात , तर काही जण पैसे देऊन मोकळे होतात. इमरान खान ने स्वतःच्या

हिमतीवर पाकिस्तानी जनतेसाठी कॅन्सर हॉस्पिटल उभारले आणि त्यासाठी लोकांकडे हात पसरून स्वतःचा स्वाभिमान देखील गहाण ठेवला , सर्वस्व अर्पण केले. तसे आपल्या इथल्या एखाद्या सेलेब्रिटी ने केल्याचे आठवत नाही आणि विशेषतः कोविड च्या ह्या काळात त्याची उणीव भासतेय” द्वारकाने नुकताच इम्रान वर खूप छान लेख लिहिला होता आणि त्या संदर्भात मी त्याला आपल्या देशात कुणास बाण मारायचा होता असे विचारले .

इम्रान खानवरचे त्याचे वरील संदर्भातील आर्टिकल मला खूप आवडले होते , त्यात राजकारणात येण्यापूर्वी त्याने पाच वर्षे स्वतःला कॅन्सर हॉस्पिटल साठी कसे झोकून दिले होते हे सविस्तर पणे मांडले होते. त्याच्या आईला कॅन्सर झाला होता आणि तिला पाकिस्तान मध्ये ट्रीटमेंट मिळाली नव्हती , तिला त्याने लंडन ला नेले खरे पण ती वाचली नाही. एवढे पैसे सामान्य नागरिकांना टाकणे शक्य नाही ह्या जाणिवेने त्याला अस्वथ केले . आणि त्याने गरिबांसाठी एकहाती हॉस्पिटल उभे केले. एक कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यासाठो जसा प्रयत्न केला गेला तसा किंवा कुठलेही मोठे समाज काम आपल्या इथले लोकप्रिय व श्रीमंत फिल्मस्टार अथवा क्रिकेटपटू झोकून देऊन करत नाहीत असे म्हणायचे होते का? नेमका रोख कुणावर होता? हे मला जाणून घ्यायचे होते.

” नवीन जनरेशन मध्ये सुद्धा चांगले मराठी लेखक आहेत, त्यांच्या आयडिया नवीन आहेत, तसेच लिटरसी वाढली आहे आणि नवीन वाचक मराठीमध्ये सुद्धा निर्माण होत आहेतच, रत्नाकर मतकरी गेले पण त्यांचा मुलगा लिहितोय की”

“तुझ्यानंतर मराठीत एवढ्या उत्साहाने लिहणार कोण ?” ह्या माझ्या शंकेच त्याने निरसन केले खरे .

“माझी पत्नी हीच माझ्या यशाची खरी धनी आहे, मी एवढा बिझी असताना तिने घर सांभाळले, मुलांना मी वाढताना पाहिलेच नाही, ती जेव्हा उंच झाली तेव्हाच कळले , अर्थात आई वडील आणि शिवाजी पार्क ह्यांचेदेखिल क्रेडिट आहेच”

“तुझ्या ह्या आयुष्यातील चढत्या ग्राफ चे श्रेय कुणाला देशील?” ह्या माझ्या पेनलटीमेट चेंडू त्याने धाव न काढता डिफेनसिव्हच खेळून काढला .

“क्रिकेट वर त्याच्याशी जास्त काय बोलणार! तसाही तो क्रिकेट वर लिहितोच आणि लोक ते सोशल मीडियावर वाचतात , पण तरी शेवटची सुपर ओव्हर तो कशी खेळतो हे मला बघायचे होते म्हणून मी त्याला काही यॉर्कर टाकले”

“मी तुला विचारतो त्यातला तुला जास्त योग्य वाटणारा एक ऑप्शन निवड ” मी त्याच्या जमान्यातील त्याच्या लाडक्या स्टार्स विषयी कैचीत पकडण्याचा प्रयत्न केला.

  1. कपिल की सुनील

सुनील ( सुनिल ला बघून तो मोठा झाला हे कसे विसरेल)

  1. देव आनन्द की गुरु दत्त

गुरू दत्त ( वेगळं टॅलेंट होत त्याच्याकडे)

  1. विजय मांजरेकर की अजित वाडेकर

वाडेकर (वाडेकर वर तर तो प्रेम करतो)

  1. द्रविड की सचिन

सचिन (त्याने देशातले क्रिकेट बदलले)

  1. अमिताभ की राजेश खन्ना

अमिताभ ( राजेश खन्ना मला कधीच विशेष आवडला नाही)

  1. ब्रॅडमन की सोबर्स

ब्रॅडमन (तरी पण हा प्रश्न कठीण वाटतो)

मी द्वारका शी जवळ जवळ दीड तास फोन वरून बोलत होतो , तो लेखणीचा दादा आहे, तसा गप्पांच्च्या विश्वाचा राजा आहे. तो क्रिकेट लिखाणा व्यतिरिक्त अनेक लाईव्ह कार्यक्रम करतो . संगीताचे दर्जेदार शो करतो , ऑडिओ व्हिज्युअल प्रोग्रॅम करतो, जागेवर खिळवून ठेवणारी प्रवास वर्णने लिहितो, सामाजिक विषयांवर , समस्यांवर प्रकाश टाकतो.

मी अनेकदा त्याला भेटलोय. मी त्याला कधीच दमलेला पहिला नाहीये . त्याला कधीही डाऊनझालेला बघितला नाहीये.

त्याच्याशी इंटरव्ह्यू च्या निमित्ताने भरपूर बोलून घेतले. “बायकोने डोळे वटारेपर्यंत तू बोलत रहा ” ह्या स्टाईल मध्ये तो अनेक विषयांवर फटकेबाजी करत होता. पत्नी नामक अंपायर ने लंच घोषित केला तेव्हा कुठे त्याने पॅड आणि ग्लोव्हज काढले .

पप्पू भन्नाट टाइम पास आहे , मनमोकळा आहे आणि झिरो इगो (झिरो शुगर कोक तसा) माणूस आहे. त्याची लिहिण्याची शैली वेगळी आहे , जोशींली आहे. त्याचे एखादा प्रसंग रंगवण्यासाठी लावलेले संदर्भ इंटरेस्टिंग असतात. तो कांबळी सारखा नुसता टॅलेंटेड नाही तर राहुल द्रविड सारखा मेहनती आहे आणि सचिन सारखा ऑल टाइम उत्साही आणि पॅशनेट आहे.

शिक्षण, नोकरी, लिखाण, प्रवास , कुटुंब हे सर्व सांभाळत त्याने अनेक गड सर केले. तो कधी थांबला असावा असे वाटत नाही आणि थांबेल असेही वाटत नाही.

” माझा स्वतःचा दादर ला एक फ्लॅट असावा असे नेहमी वाटते . एवढी मेहनत करून , स्वबळावर मिळवलेल्या लोकप्रियतेवर स्वार करून सुद्धा तो मी घेऊ शकलो नाही हीच एक गोष्ट मनाला हताश करते ” असे जेव्हा जाता जाता इमोशनल द्वारका म्हणाला तेव्हा त्याच्याएव्हढेच मलाही वाईट वाटले आणि त्याला सांगावेसे वाटले अरे यार श्रीमंती व इमानदारी हे रेल्वे ट्रॅक च्या रुळा सारखे असतात . मैलोनमैल दोन हात अंतर ठेवून खूप लांब जातात पण बरेचदा जुळत नाहीत रे , मित्रा .

SPORTSNASHA

www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.

Show Buttons
Hide Buttons