This Indian great of 70s has best ODI bowling statistics in world cup ..


भारताची फिरकी परंपरा फार पूर्वीपासून चालत आली आहे. अगदी भारताच्या पहिल्या कसोटी पासूनच. पण भारतीय फिरकीची जगातील फलंदाजांमध्ये धडकी भरवली ती बेदी, चंद्रा, प्रसन्ना आणि वेंकट या चौकडीने. या चौकडीतील सर्वात यशस्वी आणि प्रतिभावंत फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदी यांचा आज वाढदिवस. २५ सप्टेंबर १९४६ रोजी अमृतसर, पंजाब येथे जन्मलेल्या बेदी यांनी ३१ डिसेंबर १९६६ रोजी विंडीज विरुद्ध कलकत्ता येथे पदार्पण केले. पुढे भारताचे नेतृत्व करणाऱ्या बेदींनी आपल्या कारकीर्दीत ६७ कसोटीत २६६ बळी घेतले. हा भारतीय गोलंदाजीचा सर्वाधिक बळींचा विक्रम पुढे कपिलदेवने मोडला.  बेदींच्या उंची दिलेल्या आर्मरने भल्याभल्या फलंदाजांची गाळण उडाली आहे. जुनेजाणते क्रिकेटपटू, समीक्षक आणि क्रिकेट रसिकांच्या मते बेदींची गोलंदाजी न पाहिलेल्यांनी मात्र क्रिकेटची अप्रतिम मेजवानी चाखलीच नाही असे मत मांडले. चार पावलांचा छोटा रनअप घेत साईड ऑन गोलंदाजी करणारे बेदी म्हणजे एखादं सुंदर शृंगारिक प्रेमगीत सादर करताहेत असं वाटे. चेंडूला उंची देत फलंदाजाला फटके मारण्याच्या मोहात पाडत बेदी कधी फलंदाजाची शिकार करीत हे फलंदाजालाही कळत नसे. 
बेदींच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात तीन मोठ्या वादग्रस्त घटना घडल्या. १९७६ साली किंगस्टन जमेका येथील रक्तरंजित कसोटीत भारताच्या पाच जणांना दुखापतीने निवृत्त व्हावे लागले. होल्डिंगच्या बीमर आणि बाऊन्सरच्या अतिरेकी वापराबद्दल तक्रार करूनही पंचांनी ताकीद न दिल्याने दुसऱ्या डावात ५ बाद ९७ नंतर बेदींनी डाव संपल्याची घोषणा केली, डाव सोडल्याची नव्हे. दुसरी वादग्रस्त घटना मद्रास येथे इंग्लंडविरुद्ध घडली. इंग्लिश गोलंदाज जॉन लिव्हरने चेंडू चमकवण्यासाठी व्हॅसलीनचा वापर केल्याचा दावा बेदींनी केला. पण हा दावा आयसीसीने खोडून काढला. शेवटचा वाद १९७८ साली पाकिस्तान विरुद्ध एकदिवसीय सामन्यात घडला. भारताला विजयासाठी १४ चेंडूत २३ धावा आणि आठ गडी शिल्लक असताना सरफराज नवाजने लागोपाठ चार चेंडू बाउंसर टाकूनही पंचांनी वाईड न दिल्याने बेदींनी फलंदाजी करणाऱ्या गायकवाड आणि विश्वनाथ यांना माघारी बोलावून सामना पाकिस्तानला बहाल केला.
स्पष्टवक्त्या बेदींची १९८९-९० साली न्यूझीलंड दौऱ्यात व्यवस्थापक म्हणून नेमणूक करण्यात आली. पण भारतीय संघाच्या गचाळ कामगिरीवर बेदींनी या संघाला प्रशांत महासागरात बुडवायला हवं असं वादग्रस्त विधान केलं. बेदींच्या स्पष्टवक्तेपणाचा फटका सर्वाधिक कसोटी बळी टिपणाऱ्या मुरलीधरनलाही बसला. बेदींनी मुरलीच्या गोलंदाजीच्या शैलीला भालाफेक असे संबोधले. पण अतिशय प्रतिभावंत फिरकी गोलंदाज बेदींना मात्र विस्डेनने कधीच पंचकात स्थान दिले नाही हे दुर्दैव.

World record by Bedi in ODI

  • Bedi has the world record for the most economical bowling figures in a 60-over ODI match amongst the bowlers who had completed the quota of overs (12 overs). In the 1975 World Cup, Bedi with 12-8-6-1 (overs-maidens-runs-wickets) vs East Africa at Headingley, England.

आज अमृत महोत्सव साजरा करणारे बिशनसिंग बेदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
©️आशिष पोतनीस

Show Buttons
Hide Buttons