Sports in India ..A long way to go…

आपल्या देशात आता खेळाचे पोधक वातावरण तयार होत आहे. पण काही गोष्टी खटकतात. आपण फक्त खेळाडूने मेडल जिंकल्यावर त्याची दखल घेतो.तो खेळाडू बनत असतो तेव्हा त्याला ही दखल हवी असते. त्याला मदत तेव्हा हवी असते. तो मोठा बनल्यावर त्याला नको असले तरी लोक पैसे देतात.

त्याला वेगवेगळ्या समारंभाला बोलावले जाते. पण ज्या अडचणींना तोंड देऊन तो खेळाडू मोठा होत असतो, त्याची जाणीव खेळाडूच्या पालकांना आणि खेळासाठी काम करणाऱ्या संस्थांना असते.


पण खेळाची आपली समस्या आता परत भीषण आहे करोना मुळे. जे मोठे खेळाडू आहेत त्यांना खेळायला मिळत आहे पण जे मोठे होण्यासाठी धडपडत आहेत, त्यांची हालत खूप वाईट आहे.

जी प्रशिक्षण केंद्र आहेत, त्यांचे कंबरडे मोडले आहे. खेळाडूंचे पालक द्विधा मनस्थितीत आहेत. प्राधान्य कशाला द्यायचे हे त्यांना समजत नाहीये. आर्थिक तंगीतून खेळाडू वरचा खर्च पालकांना परवडणारा नाहीये.

फक्त राज्यअसोसिएशन ला पैसे देऊन भागणार नाही. खेळाडू खरा तयार होतो ह्या grass root academies मध्ये.आपण सर्वांनी सढळ हस्ते ह्या प्रशिक्षण केंद्राना मदत केली पाहिजे तर आपला खेळ आणि खेळाडू वाचतील. खूप लिहिण्यासारखे आहे. अनेक जण ज्यांनी ठरवले होते की आता मी शिक्षण फक्त नावापुरते घेणार आणि पूर्ण वेळ सराव करणार माझ्या खेळाचा, ते पुनर्विचार करत आहेत. 2 अत्यंत महत्वाची वर्षे उदयोन्मुख खेळाडूंची फुकट जात आहेत. आता जरी क्रिकेट मध्ये दिसत असले तरी विचार केला पाहिजे की किती देश क्रिकेट खेळतात ? आणि रणजी करंडक, दुलीप करंडक, इराणी करंडक सामने रद्द झाले मागच्या वर्षी तेव्हा ह्याचे ही परिणाम होऊ शकतात भविष्यात. अतिशय खडतर मार्ग असतो खेळाडूचा.

DSO च्या सुविधा राहण्याच्या, खाण्याच्या इतक्या भीषण आहेत, की त्यातून हे खेळाडू ऑलिम्पिक साठी पात्र ठरतात हेच कौतुकास्पद आहे. ह्या स्पर्धांचे सामना अधिकारी वगैरे असतात, ते केवळ सरकारने पाठवले म्हणून आलेले असतात. कुठल्याही खेळाडू आणि पालकांना विचारावे. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पण हीच गत. स्पोर्ट्स मॅनेजमेंट मधील जाणकार लोक ह्यात आणले पाहिजेत. दुसरे एक भीषण सत्य आहे की मध्यमवर्गातील अनेक पालकांना पण खेळाचा खर्च परवडत नाही. पण त्यांना मदतीला कोणीच पुढे येत नाही. प्रायोजक असतात त्यांनी पैसे ओतले की त्यांना वाटते की मेडल आणले पाहिजे. ही मानसिकता जात नाही तो पर्यंत काहीही होणार नाही.

जो खेळाडू वर्षानुवर्षे नियमित सराव करतोय , राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतोय, त्या सर्वांना मदत हवी असते. दर सहा महिन्याला शूज, कपडे, साहित्य घ्यावे लागते.

Physiotherapy, Nutrition, Strength and Conditioning, Injury management, Injury Prevention, Sports Psychology, Sports Coaching ह्याचा खर्च खूप आहे .
आपण जेव्हा भेटतो, तेव्हा समोरच्याला विचारतो की आपण काय करता ?
जेव्हा आपण एकमेकांना विचारू की आपण काय खेळता, तेव्हा देशाची खेळांत प्रगती होईल.

प्रत्येक नागरिकाने येणाऱ्या वर्षात कुठलातरी एक खेळ खेळावा, किंवा त्याच्या बद्दल माहिती घ्यावी, त्या खेळाला, खेळाडूंना मदत करावी, त्यांच्या समस्यांना अधिकारी, संघटने पर्यंत पोचवावे, निदान एक प्रशिक्षण केंद्राला भेट द्यावी. नक्की फरक पडेल इतर खेळात पण.
खेळाडूंना मैदाने मिळत नाहीत. अनेकवेळा कॉर्पोरेट सामान्यांसाठी मैदाने दिली जातात. त्यांना कितीही भाडे परवडते. दुपटीने पण ते भाडे देऊ शकतात. पण तिथे शनिवार रविवारी खेळणारे हौशी खेळाडू. त्यांनी मैदानाचा कब्जा घेतल्यामुळे होतकरू खेळाडूंना संधी मिळत नाही आणि ह्या गोष्टींचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे.

सर्व क्रीडा रसिकांना विनंती आहे की ज्या ज्या प्रकारे मदत करता येईल , तशी मदत खेळाडूंना , त्यांच्या प्रशिक्षककाला, प्रशिक्षण केंद्राला करा. परिस्थिती बिकट आहे.
राजेश देव
28/07/ 2021

SPORTSNASHA

www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.

Show Buttons
Hide Buttons