This West Indian scored a century in a successful Chase of 418 against Australia ..

वाढदिवसाचे अभिष्टचिंतन२३ जून
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग कोणत्या संघाने केलाय? २००३ साली वेस्ट इंडिजने आणि या विजयाचा पाया रचला तो रामनरेश सरवान याने. आज २३ जून, सरवानचा वाढदिवस. २३ जून १९८१ रोजी गयाना येथे जन्मलेला भारतीय वंशाचा रामनरेश सरवान याने ८७ कसोटी आणि १८१ एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले. २००९ साली इंग्लंडविरुद्ध २९१ धावा करणाऱ्या सरवानला आपले पहिले शतक झळकावण्यासाठी तब्बल २८ कसोटी सामन्यांची प्रतिक्षा करावी लागली. कसोटी पदार्पणातील त्याच्या खेळीने प्रभावित झालेले टेड डेक्स्टर यांनी सरवान हा ५०ची सरासरी गाठेल असे भाकीत केले होते. विंडीजचे नेतृत्व करणारा सरवान उत्तम फलंदाजी सोबत लेगस्पिन गोलंदाजीही करीत असे.
सरवानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावलेले शतक हे त्याच्या कारकिर्दीतील मानबिंदूच. सेंट जॉन्स, अँटिगा येथील कसोटीत ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ४१८ धावांचा पाठलाग करताना सरवानने शतक (१०५) झळकावत विंडीजच्या विजयाचा पाया रचला. या सामन्यात ग्लेन मॅकग्रा आणि रामनरेश सरवान यांची शाब्दिक बाचाबाची प्रचंड गाजली होती. तत्कालिन आय. सी. सी. चे अध्यक्ष माल्कम ग्रे यांनीदेखील याची दखल घेत ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या वाढत्या आक्रमक वर्तनाबद्दल चिंता व्यक्त केली होती. स्वतः ऑस्ट्रेलियन असलेले ग्रे यांनी ऑस्ट्रेलियन्स हे जगातले नावडते क्रिकेटपटू होत असल्याची खंत व्यक्त केली. या प्रकरणात प्रथम मॅकग्राने अपशब्द वापरले आणि त्याला प्रत्युत्तर देताना सरवानने मॅकग्राच्या पत्नीचा उल्लेख केला. शेवटच्या घटका मोजणार्‍या मॅकग्राच्या पत्नीच्या उल्लेखाने बाचाबाची अजूनच वाढली. पण नंतर मॅकग्राच्या पत्नीची अवस्था कळल्यावर सरवानने मॅकग्राची समजूत काढत हा वाद मिटवला.
रामनरेश सरवान याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
©️आशिष पोतनीस

SPORTSNASHA

www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.

Show Buttons
Hide Buttons