State Junior kick boxing tournament – Updates

In a  state Junior kick boxing tournament at Ahmednagar Vasai Virar kick boxing team won 77 medals and stood second
congratulations to them
कनिष्ठ राज्यस्तरीय किकबॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धेत
वसई-विरार किकबॉक्सिंग संघ
77 पदके जिंकून दुसर्‍या क्रमांकावर
वसई ः अ‍ॅम्युचर स्पोर्ट्स किकबॉक्सिंग संघटना यांच्या विद्यमाने अहमदनगर येथे 34वी महाराष्ट्र राज्यस्तरीय केडीट अ‍ॅण्ड जुनिअर किकबॉक्सिंग सिलेक्शन चॅम्पीयन शिप 2019 ही स्पर्धा पार पडली. मागील वर्षांची पुनरावृत्ती करत वसई-विरारच्या मुला-मुलींनी पुन्हा एकदा वर्चस्व गाजविले. ही स्पर्धा 16 ते 18 ऑगस्ट रोजी अहमदनगर येथे आयोजित करण्यात?आली होती. सदर स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून 936 स्पर्धकांनी भाग घेतला होता. आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक असलेल्या सुर्यप्रकाश मुंडापाट यांच्या नेतृत्वाखाली वसई-विरारमधून जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकलेली 53 मुला-मुलींची निवड या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली होती. या स्पर्धेसाठी वसई-विरारमधून राष्ट्रीय स्तरावरील पंच सपना मुंडापाट, रुपा रेमेडीयस, राजश्री महाजन, कॉलेटीया डायस व ज्योती गोदावरीकर हेही तेथे उपस्थित होते. सदर स्पर्धकांनी या स्पर्धेत आपले वर्चस्व कायम ठेवत 34 सुवर्ण, 17 रजत व 26 कांस्य अशी एकूण 77 पदके मिळविली. याचबरोबर त्यांनी दुसर्‍या क्रमांकाची ट्रॉफी देखील मिळविली. मुलांच्या या यशामध्ये त्यांच्याबरोबर कोच म्हणून गेलेले सिद्धांत मुंडापाट, सायली कानत व सागर भोईर यांचा सिंहाचा वाटा आहे.
या स्पर्धेमध्ये वेल्मा रेमेडीयस (4 गोल्ड), स्मित गंगीकर (2 गोल्ड, 2 सिल्वर), शौर्य मुंडापाट (2 गोल्ड, 1 सिल्वर), अक्षय महाजन (2 गोल्ड, 1 सिल्वर), कार्मेलिना फर्नांडिस (2 गोल्ड), राहुल कुबतीया (2 गोल्ड), जान्हवी गायकवाड (2 गोल्ड), अक्षिता देवलाल (2 गोल्ड), स्टीयाना वेसावकर (2 गोल्ड, 2 ब्रॉन्झ), भव्य ठक्कर (2 गोल्ड), मयुर साळगावकर (1 गोल्ड, 1 सिल्वर), अर्थव पेटकर (1 गोल्ड, 1 बॉन्झ), लोचना गोदावरीकर (1 गोल्ड, 1 बॉन्झ), प्रियल पाटील (1 गोल्ड, 1 बॉन्झ), सानवी पाटील (1 गोल्ड, 1 बॉन्झ), ऋशिका पाटील (1 गोल्ड, 1 बॉन्झ), वेदान्त मच्छीवाल (1 गोल्ड, 1 बॉन्झ), रेहान शेख (1 गोल्ड), पियुश भायरामकर (1 गोल्ड), सानवी चौधरी (1 सिल्वर, 1 बॉन्झ), अग्रीमा देवलाल (1 सिल्वर, 1 बॉन्झ), सोहम मच्छीवाल (2 सिल्वर, 1 बॉन्झ), ओझेस कुबल (1 सिल्वर, 2 बॉन्झ), मयुरेश चौगुले (1 सिल्वर), शुभम कांबळी (1 सिल्वर), शिप्रा मोहिते (1 सिल्वर), आर्यन गायकवाड (1 सिल्वर), पायल सिंग (1 सिल्वर), आदित्य बिलारे (1 सिल्वर), रिंकल कदम (1 सिल्वर), तेजस्वी गहिला (2 ब्रॉन्झ), प्रिती पाटील (1 ब्रॉन्झ), हर्षिता पाटील (1 ब्रॉन्झ), अदिती भोसले (2 ब्रॉन्झ), अदित्य एतम (1 ब्रॉन्झ), अंकीत चौरासिया (1 ब्रॉन्झ), कृती भाराडे (1 ब्रॉन्झ), हार्दिका वैती (1 ब्रॉन्झ), जीत संखे (1 ब्रॉन्झ), निल डिब्रिटो (1 ब्रॉन्झ), प्रज्वल पांडारे (1 ब्रॉन्झ), सायली कानत 1 गोल्ड, सागर भोईर 1 गोल्ड यांच्यासोबत सहभाग झालेले स्पर्धेक संभव साळगावकर, मानस भामारे, प्रिन्स झा, आर्यन गुप्ता, आदित्य सिंग, प्रणाली मोडक, समता पाखाड, सार्थक तातेम, गौरव बिंद, वैषाली दुर्गले यांचा सहभाग होता.
सदर यशाबद्दल प्रशिक्षक सुर्यप्रकाश मुंडापाट यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, वसई ही क्रिडानगरी आहे. येथे मुला-मुलींना क्रिडा स्पर्धेत प्रोत्साहित करण्यासाठी आमदार हितेंद्र ठाकूर, पालघर डिस्ट्रीक किकबॉक्सिंग असोसिएशनचे चिफ पेट्रेन असलेले अफिफ शेख, महापौर, नगरसेवक, वसई-विरार महापालिका व क्रिडा अधिकारी यांचे सहाय्य तसेच मार्गदर्शन वेळोवेळी मिळत असते. वसई-विरारच्या किक बॉक्सर्सना मिळालेल्या यशाबद्दल सर्व राजकीय व सामाजिक स्तरावरून त्यांना वाहवा मिळत आहे.