National Kick Boxing Championship- Virar (Mumbai) Participants Shine

National Kick Boxing Championship was held at Rohtak Haryana from 18 to 21 July. In this the Six Virar  Mumbai players who represented Maharashtra won 7 Gold 2 Silver and 1 bronze medal (total 10 medals)  Sayali was given Champion of Tournament Award for her outstanding performance of 4 Golds
Name of winners
1.Sayli Kanhat – 4 GOLDS
2. Sidhant Mundapat-1 GOLD and 1 SILVER
3.F.Desilva-1 GOLD
4.Ian Rodrigues-1 GOLD
5.Ritehsh Prajapati -1 SILVER
6. Sagar Bhoir-1 BRONZE
All the above players are trained in one academy where Suryaprakasha Mundapat is the coach. He gave credit for the above performance to players’ hard work and favorable sporting environment in VIrar Vasai areas,

हरियाणा रोहतक येथे दिनांक 18 ते 21 जुलै रोजी पार पडलेल्या सिनिअर नॅशनल किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत वसई विरारच्या 6 खेळाडूंनी महाराष्ट्र संघातर्फे खेळतांना पुन्हा एकदा आपला दबदबा कायम राखत घवघवीत यश संपादित केले.


भारताच्या विविध राज्यातून ह्या स्पर्धेसाठी आलेल्या संघामध्ये महाराष्ट्राचा 23 खेळाडूंचा संघही सहभागी झाला होता. महाराष्ट्राच्या संघाने उपविजेतेपद पटकावताना 14 सुवर्ण, 8 रजत, 4 कांस्यपदक अशा एकूण 26 पदकांची कमाई केली. ह्यात विशेष बाब म्हणजे वसई विरारच्या 6 खेळाडूंनी मिळून 7 सुवर्ण, 2 रजत व 1 कांस्य अशा एकूण 10 पदकांची लयलूट केली.


पदकविजेते खेळाडू

1. सायली कान्हात – 4 सुवर्ण (‘चॅम्पियन ऑफ टूर्नामेंट’) 
2. सिध्दांत मुंडापाट – 1 सुवर्ण, 1 रजत
3. फेबियन डिसिल्वा – 1 सुवर्ण
4. ईयान रॉड्रिग्ज – 1 सुवर्ण
5. रितेश प्रजापती – 1 रजत
6. सागर भोईर – 1 कांस्य

सर्व खेळाडू हे एकाच संस्थेत प्रशिक्षण घेत असून वसई विरारच्या ह्या सततच्या यशामागचे रहस्य जाणून घेण्यासाठी संस्थेचे मुख्य प्रशिक्षक व आंतरराष्ट्रिय पंच श्री. सूर्यप्रकाश मुंडापाट ह्यांची भेट घेतली असता त्यांनी ह्या यशामागचे कारण ही खेळाडूंची अपार मेहनत तसेच खेळाडूंना घडविण्यासाठी लागणारे वसई विरारचे पोषक वातावरण ही कारणे दिली. पालघर जिल्ह्यातून चांगल्या खेळाडूंना हेरून त्यांना प्रशिक्षण देणे तसेच महिलावर्गाला स्वसंरक्षणाचे धडे देणे हा ह्या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.

वसई विरारच्या किकबॉक्सर्सनी मिळविलेल्या यशाबद्दल सर्व राजकिय व सामाजिक स्तरावरून त्यांना वाहवा मिळत आहे.