Autograph collector Satish Chaphekar’s Exhibition in Mulund

 

माझे नाव सतीश लक्ष्मण चाफेकर असून मी मो. ह . विद्यालयाचा विद्यार्थी १९७४ पर्यंत होतो त्यानंतर मी ठाणे कॉलजमधून बी. कॉम . केले. त्यानंतर मी तिथूनच बी. ए . केले. तर मुंबई विद्यापीठाकडून मराठीमधून एम. ए . केले. शिकत असताना मी दोन ठिकाणी नोकरी केली आणि १९९३ साली अचानक नोकरी सोडली कारण एक दिवशी माझ्या लक्षात आले की  हुशार विद्यार्थाना सगळेच  शिकवतात . परंतु जे विद्यार्थी अभ्यासात  कमी असतात ,  झोपडीत रहातात त्यांना सहसा कुठे जाता येत नाही म्ह्णून अशा मुलांना अल्प फी मध्ये तर काही मुलांना  फुकट शिकवले असे मी २३ वर्षे माझ्या घरातच शिकवत होतो. सुमारे माझ्याकडून ३००० च्या वर  विद्यार्थी शिकून गेले आणि आपल्या आयुष्यात स्थिर झाले.
त्यापूर्वी मला वयाच्या ११ व्या वर्षी मान्यवर लेखक ,  कलाकार , वैज्ञानिक अशा सुप्रसिद्ध व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या घेण्याचा छंद जडला तो आजतागायत म्हणजे जवळजवळ ५० वर्षे चालू आहे. आज माझ्याकडे जवळजवळ १०, ००० मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहे. ह्यामुळे मला नील आर्मस्ट्राँग, जॅकी चॅन , रिचर्ड गेर , बिजोन बोर्ग पासून ए .पी. जे . अब्दुल कलाम , जयंत नारळीकर , सुनील गावस्कर , कपिल देव, सचिन तेंडुलकर , कुसुमाग्रज , बा.भ. बोरकर , विंदा करंदीकर अशा शेकडो नामवंताना भेटता आले.
मी जवळ जवळ सर्वच वृत्तपत्रातून सुमारे ४५० ते ५०० च्या आसपास लेख लिहिले. सध्या दैनिक लोकमत मध्ये दररोज माझे ‘ अक्षररेषा ‘ हे सदर १ जानेवारी २०१७ पासून चालू आहे . त्याआधी वर्षभर  मी लोकमत मध्ये ‘ ८ वी ड ‘ हे सदर लिहीत होतो त्यामध्ये मला शिकवताना जे अनुभव आले ते लिहीत होतो. जवळ जवळ दीड  वर्षात मी सुमारे २६० लेख  लोकमतमध्ये  लिहिले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र टाईम्स , लोकसत्ता , गावकरी अशा अनेक वृत्तपत्रातून लिहिलेले आहेत.
मी स्वाक्षरी गोळा करता  हस्ताक्षराचा अभ्यास केला , त्याला इंग्रजीमध्ये ग्रॅफालॉजी  म्हणतात. काही वर्षांपूर्वी मी ‘ स्टार माझा ‘ आणि कधी कधी स्टार चॅनेल वर क्रिकेटपटुंच्या स्वाक्षऱ्यासंबंधी बातम्यांमध्ये बोलत असे , तसे  मी पहिल्यांदा  आय. पी. एल . , दोन वर्ल्ड कप साठी त्या चॅनेलवर होतो , तर पुढले वर्ल्ड कप साठी  मी ‘ जय महाराष्ट्र्र ‘ या चॅनेलसाठी होतो.
माझ्या नावावर ‘ तीन लिम्का ‘ रेकॉर्डस् असून नुकताच तिसरा रेकॉर्ड कन्फर्म झाला आहे. मी डोंबिवलीला अनोखे स्वाक्षरी संग्रहालय बनवले असून तिथे अनेक मान्यवर आपले स्वाक्षरी करून गेले आहेत त्यामध्ये डॉ . माशेलकर, डॉ. विजय ,भटकर  डॉ . वसंत गोवारीकर ,  बाबासाहेब पुरंदरे , निदा फाजली , कवी ग्रेस , महेश काळे , शौनक अभिषेकी , डॉ. प्रकाश आमटे , अतुल परचुरे, रत्नाकर मतकरी, मधू मंगेश कर्णिक , प्रवीण दवणे , मंदाकिनी आमटे , वासुदेव कामत असे सुमारे १६० जण स्वतः स्वाक्षरी करून गेले आहेत. हे घर भारतातील पहिलेच असे घर आहे म्हणून त्याचा ‘ लिम्का रेकॉर्ड ‘ झाला आहे.
माझ्या ह्या कामाची दखल भारतामधील आणि भारताबाहेरील अनेक  भाषेतील  चॅनेलनी आणि वृत्तपत्रांनी घेतली आहे.
हल्ली मी आकाशवाणीच्या ‘ अस्मिता ‘ वाहिनीवर क्रिकेट संबधी बातम्या देत असतो, त्याला ‘ क्रिकेट अपडेट्स ‘ म्हणतात. मी आकाशवाणीवर  १९८० पासून कार्यक्रम  करत आहे. हालली सतत लेखन आणि रेडिओवर कार्यक्रम चालू असून ,  बाहेर ‘ मी सह्याजीराव ‘ नावाचा मला माझ्या छंदावर आधारित  कार्यक्रम करत असतो. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी माझ्या ‘ स्वाक्षरी संग्रहाची ‘ प्रदर्शने भरवत असतो. हल्ली १ जानेवारी २०१७ पासून दररोज दैनिक लोकमत मधील ‘ हॅलो ठाणे ‘ या पुरवणीत ‘ क्रिकेटरेषा  ‘ हे सदर लिहीत आहे. प्रत्येक क्रिकेटपटू वर लिहीत असून आटा ९० आर्टिकल्स लिहिली असून वर्षभर हे सदर चालू रहाणार आहे.
आटा पर्यंत माझ्या छंदावर मी सुमारे ७०० च्या वर आर्टिकलस विविध वृत्तपत्रांमधून लिहिले आहेत. ५ आणि ६ मे रोजी मुलूंडन जिमखाना येथे क्रिकेटपट आणि काही प्रमुख खेळाडूंच्या सुमारे ३००० स्वाक्षऱ्यांचे प्रदर्शन भरवले आहे त्यामध्ये सर डॉन बर्डमॅन पासून जवळ जवळ सर्व प्रमुख क्रिकेटपटुंच्या स्वाक्षऱ्या ठेवल्या आहेत.   तसेच रॉजर फेडरर , जॅकी चॅन , बिजोन बोर्ग , मरीया शारापोव्हा  यांच्याशी  स्वाक्षऱ्या आहेत.
माझ्या नावावर ३ लिम्का रेकॉर्ड्सची नोंद असून पहिला लिम्का रेकॉर्ड माझ्या डोबिवलीमधील स्वाक्षऱ्यांच्या घराचा आहे , तर दुसऱ्या रेकॉर्ड राहुलड द्रविड ने ४८ शतके केली म्हणून त्याच्या ४८ स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत, तिसरा रेकॉर्ड माझा सचिन तेंडुलकरच्या १९९० पासून २०१४ पर्यंत १०० स्वाक्षऱ्या घेतलीत आहेत याचाही लिम्का रेकॉर्ड  रेकॉर्ड झाला आहे.
 Some Snaps-
TEAM SPORTNASHA