🏆 CKP Premier League ’18 🏆

 

सादर करत आहे
प्रकाशझोतातील क्रिकेट टूर्नामेंट
(फक्त सीकेपी  ज्ञातीबांधवांसाठी)
शनिवार दि. २६ मे २०१८
सायंकाळी ४ वाजल्या पासून मध्यरात्रीपर्यंत

स्थळ – द पीच, हॉटेल निवांत जवळ, येऊर हिल्स, ठाणे.

शिक्षण – कला – क्रीडा – व्यवसाय – खाद्य आणि अनेक क्षेत्रात आपल्या अस्तित्वाची छाप पाडणारा आपला सीकपी समाज.  आजपर्यंत या ना त्या अनेक कारणांसाठी आपण एकत्र येतो, विचारांची देवाणघेवाण करत गुण्यागोविंदाने रहातो आणि समाजाप्रती आपल्या कर्तव्याचे भान ठेऊन समाजबांधवांच्या सुखदुःखात समरस होतो.  ज्ञातीचे हेच बंध, हाच स्नेहभाव वृद्धिंगत होण्यासाठी आम्ही ठाण्याच्या काही मित्रमंडळींनी एकत्र येऊन आपल्या खिलाडू वृत्तीच्या क्रिकेटप्रेमी  ज्ञातिबांधवांसाठी एका क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. आपण आपल्या शहरातील सीकेपी ज्ञातिबांधवांची टीम घेऊन या स्पर्धेत भाग घेऊ शकता.  आर्टिफिशल टर्फ वर खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी नामांकित अम्पायर्स  आणि स्कोरर हजर असतील.

या स्पर्धेतील विजयी संघाला रु २१०००/-  रोख अधिक एक भव्य फिरता करंडक आणि उपविजेत्याला रु. ११०००/-  रोख असे भव्य बक्षीस ठेवण्यात आले आहे.  या स्पर्धेत भाग घेण्यासाठी रु. ५०००/- फी आकारली जाईल ज्यामध्ये खेळाडूंसाठी टी शर्ट्स, एक वेळेचा नाश्ता आणि चहा समाविष्ट असेल. या साठी आपल्या संघाची नोंदणी खाली दिलेल्या आयोजन समिती सदस्यांकडे करू शकता.

या व्यतिरिक्त  या स्पर्धेदरम्यान उपस्थित ५५ वर्षावरील जेष्ठ ज्ञातिबांधवांची एक मॅच, ज्ञातिभगिनींची एक मॅच आणि ८  ते १४ वयोगटातील मुलांसाठी एक मॅच अशा तीन विशेष मॅचेस चे आयोजन सुद्धा केले आहे. या साठी कोणत्याही नोंदणीची व फी ची गरज नाही.

लवकरात लवकर आपल्या संघाची नोंदणी करा आणि समाजाच्या या आगळ्या वेगळ्या क्रिडा उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हा !

नोंदणीसाठी संपर्क 

अमेय रणदिवे  
9821543713
राहुल लिखिते
9773843382
ऋग्वेद कारखानीस 8369640980

आयोजक
समीर गुप्ते, राहुल लिखिते, यशोधन देशमुख,अमोघ मथुरे, देवांग गोळे, निलेश गुप्ते, अमेय रणदिवे, सारंग कर्णिक, चेतन चिटणीस, जयदीप कोर्डे , ऋग्वेद कारखानीस, सायली रणदिवे, मानसी गुप्ते, सोनल ओगले आणि अनेक ज्ञातिबांधव

 

 

 

Team Sportsnasha

Show Buttons
Hide Buttons