Chess world championship report by Aneesh
सध्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा चालू आहे.
दुसऱ्या फेरीअखेर विशी आनंद, मायकेल अॅडॅम्स ,बोरिस गेलफँड, सर्जेई कर्झाकिन ,तूर रडो व्हायला ,महिलांची विश्वजीत हू यिफान , पेंड्याला हरिकृष्णा ,महारथी गारद झाले आहेत.
काल तिसर्या फेरीतून आता चक्क मॅग्नस कार्लसनच बाद होण्याची सनसनाटी निर्माण झाली आहे.
सध्या ही स्पर्धा जबरदस्त उत्कंठावर्धक होत आहे.
काल या स्पर्धेतून पहिल्या दोन्ही फेर्यांमधून वारूझान अकोबियन व विशी आनंद या दिग्गजांना हरवणार्या कॅनडाच्या अँटन कोव्हालियाॅव्हवर तर चक्क हाफ शाॅर्ट पँटस घालून आल्याने ड्रेसकोडपायी खेळण्यास बंदी घालण्यात आली.
त्याला फुल पँटस घालून खेळायला सांगितल्यावर त्याने चक्क स्पर्धाच सोडून आता एकच खळबळ उडवून दिली आहे.
पहिल्या दोन्ही फेर्यांतुन अगदी तीच शाॅर्ट पँटस घालून खेळणाऱ्या अँटनची ही पँट कोणाला खटकली नव्हती.
आता मात्र यावरून वाद सुरू झाले आहेत.
यावेळचा जागतिक बुद्धिबळ विश्वविजेता अगदी नवीन ताजा होतकरू खेळाडू बनणार हे मात्र मी पैजेवर सांगत आहे.
You will be our reporter