CHESS SPECIAL BY ANEESH DATE

जॉर्जिया देशाची राजधानी टबाइलिसी येथे सुरु असलेली २०१७ ची फिडे बुद्धिबळ जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आता उपांत्य फेरीत पोचली आहे.

पैकी चीनचा डिरेन लिंग आणि अमेरिकेचा सो वेस्ली यांच्यात उपांत्य फेरीची पहिली लढत होत आहे.
आर्मेनियाचा लेव्हॉन एरोनियन हा उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात खेळणार असून त्याचा प्रतिस्पर्धी अजूनही ठरलेला नाही.

फ्रान्सचा मॅक्झिम व्हॅचिअर – लाग्रेव्ह आणि रशियन फेडरेशनचा पीटर स्वीडलर यांच्यातली लढत अजूनही सुरु असून त्यांचे पहिले दोन्ही सामने बरोबरीत सुटले आहेत.उपउपांत्य फेरीतला हा एकच सामना तोडीस तोड होत आहे आणि त्यांच्यातला विजेता हा लेव्हॉन एरोनियनबरोबर उपांत्य फेरीतल्या दुसऱ्या सामन्यात खेळणार आहे. हा एकच अपवाद वगळता उपउपांत्य फेरीतले इतर सामने अपेक्षेप्रमाणे म्हणावे तेवढे काही रंगले नाहीत.

त्याआधी चौथ्या फेरीतले सगळे सामने रंगतदार झाले.
युक्रेनचा व्हॅसिली इव्हॅनचुक आणि हॉलंडचा अनीश गिरी या सुपर ग्रँडमास्टरमध्ये झालेल्या लढतीत इव्हॅनचुकने गिरीवर सहज मात केली.त्यांच्यात झालेल्या दुसऱ्या सामन्यात खरं तर गिरीचा सामना गेलाच होता.पण ४७ व्या चालीला इव्हॅनचुकने R c ६ ही खेळी करण्याऐवजी R b ६ ही खेळी केल्याने लढत शेवटी बरोबरीत सुटली.४७ व्या चालीला इव्हॅनचुकने जर R c ६ ही खेळी केली असती तर तिथेच शह आणि मात निश्चित होती.

चौथ्या फेरीतल्या आणखी एका सामन्यात यजमान जॉर्जियाचा ग्रँडमास्टर बादुर जोबाव्हाकडून खुप अपेक्षा होत्या.अपेक्षेप्रमाणे त्याने अमेरिकेच्या सुपर ग्रँडमास्टर सो वेस्लीविरुद्ध चांगला खेळ केला खरा.पण पहिले दोन्ही सामने अनिर्णित अवस्थेत सुटल्यावर वेस्लीने त्याच्यावर तिसऱ्या सामन्यात मात करून एका पुर्ण गुणाची आघाडी घेतली आणि परत चौथा परतीचा सामना बरोबरीत सोडवून एका गुणाची आघाडी राखत जोबाव्हावर २.५ – १.५ अशा फरकाने मात केली.

चौथ्या फेरीतल्या आणखी एका तिसऱ्या रंगलेल्या सामन्यात हंगेरीच्या ग्रँडमास्टर रिचर्ड रॅपर्टने रशियाच्या ग्रँडमास्टर इव्हगेनी नाजेरविरुद्ध पहिले तीन डाव बरोबरीत सुटल्यानंतर चौथ्या सामन्यात अखेर मात केली.या चौथ्या सामन्यात नाजेरची परिस्थिती वरचढ होती पण ४६ व्या चालीला घोड्याने प्यादे मारायची आणि नंतर ४९ व्या चालीला त्याच घोड्याची केलेली c १ + ही खेळी त्याला महागात पडली. परिणामी घोड्याचा फुकट बळी गेल्याने नाजेरचे उपउपांत्य फेरीत जायचे स्वप्न भंगले.
चौथ्या फेरीत खेळल्या गेलेल्या इतर सामन्यांपैकी इस्राएलच्या मॅक्झिम रॉडष्टीन आणि रशियाच्या व्लादिमिर फेडोसिव्ह या ग्रॅण्डमास्टर्समधील खेळले गेलेले चारीच्या चारी सामने निकाली झाले.या निकाली झालेल्या सामन्यात फेडोसिव्हने शेवटी रॉडष्टीनवर ३ – १ अशी मात केली.

चौथ्या फेरीतील सर्वात रंगतदार सामना फ्रान्सचा मॅक्झिम व्हॅचिअर – लाग्रेव्ह आणि रशियाचा अलेक्झांडर ग्रिश्चुक या सुपर ग्रॅण्डमास्टर्समध्ये झाला.
त्यांच्यात तब्बल सहा सामने खेळले गेले.पहिले चार डाव बरोबरीत सुटल्यानंतर पाचव्या डावात सध्या जबरदस्त फॉर्मात असलेल्या मॅक्झिम व्हॅचिअर – लाग्रेव्हने ४४ व्या चालीला R d ७ ही सातव्या घरात हत्ती नेण्याची कल्पक खेळी करत ग्रिश्चुकला कोंडीत पकडून ठेवणारी मात केली आणि लगेच पुढचा सहावा डाव बरोबरीत सोडवून उपउपांत्य फेरीत अपेक्षेप्रमाणे प्रवेश केला.

आता उपांत्य फेरीतील लेव्हॉन एरोनियनचा प्रतिस्पर्धी ठरणे बाकी असून तो कोण असेल ते उद्याच्या सामन्यात निश्चितपणे कळेल.
मात्र फ्रान्सचा मॅक्झिम व्हॅचिअर – लाग्रेव्ह आणि रशियन फेडरेशनचा पीटर स्वीडलर या तुल्यबळ सुपर ग्रॅण्डमास्टर्स मधली लढत जबरदस्त होत असल्याने विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल याची खात्री देता येत नाही.
बुद्धिबळाच्या डावात चांगले खेळून देखील कधी कधी अशीही वेळ येते की काहीही व कसंही खेळलं तरी डाव जातोच.

पाहायचं आता काय होतंय ते.
तेव्हा चलो जॉर्जिया देशाची राजधानी टबाइलिसी ये

SPORTSNASHA

www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.

Show Buttons
Hide Buttons