Respect Seniors

अरे विराट , 2011 ला विश्व चषक जिंकल्यावर सचिन ला खांद्यावर उचलून संपूर्ण मैदानाला फेरी मारणारा तूच ना ?? तू सांगितलें की सचिन ने फलंदाजीची धुरा खांद्यावर घेतली . आता मी एक दिवस घेतल तर काय झाले ??
अरे मग तेवढीच वर्षे गोलंदाजीची धुरा सांभाळणारा कुंबळे तू विसरलास ?? त्याला इतकी अपमानास्पद वागणूक दिलीस ?? सिनियर खेळाडूंना मान देण्यात कसला कमी पणा वाटतो तुला ??
आम्ही गावस्कर, विश्वनाथ, वेंगसरकर, मोहिंदर अमरनाथ , सचिन, द्रविड, लक्ष्मण , गांगुली या अशा अनेक फलंदाजांना बघितले आहे आणि ते आजच्या तुझ्या संघातल्या अनेक फलंदाजा पेक्षा उच्च दर्जाचे आहेत. त्यांचा मान राख. त्यांचे सल्ले घ्या. तुमचा खेळ सुधारेल. एक चांगला माणूसच चांगला खेळाडू होऊ शकतो. आज अनेक गोष्टी मुळे तुला आपण सर्वांपेक्षा मोठे झालो असे वाटत असेल तर तो तुझा मोठा गैरसमज असेल. तुझ्या संघातल्या जलद गती गोलंदाजांना सांग की कपिल देव, झहीर, नेहरा, श्रीनाथ ह्यांचा सल्ला घ्या. त्यांना गुरूचा दर्जा द्या.
फिरकी गोलंदाजांना सांग की बेदी, प्रसना, चंद्रशेखर, वेंकटराघवन ह्यांना विचारा पाटा विकेट वर कशी गोलंदाजी करायची. फक्त आकडेवारी मध्ये गुंतला असाल आणि स्वतःला महान समजत असाल तर लवकर जमिनीवर या आणि आजच्या तरुणांना चांगला आदर्श घालून द्या. IPL न बघणारा, रणजी ट्रॉफी अजून enjoy करणारा एक माझ्या सारखा चाहता खूप दुःखी आहे ह्या सर्व प्रकरणात. ही आपल्या संघाच्या उतरत्या performance ची सुरवात आहे असे वाटते.
गावस्कर, विश्वनाथ, वेंगसरकर, मोहिंदर ..ह्या सगळ्यांनी हेल्मेट शिवाय वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लड…ह्यांच्या गोलंदाजांना खेळले आहे. त्या वेळी जिम नव्हते आजच्या सारखे. इतिहासाची कदर नसलेले आज तुझे चाहते असतील तर त्यांच्या खोट्या कौतुकात खुश होऊ नकोस आणि आपल्या कसोटी क्रिकेट चा इतिहास वाच आणि तुझ्या उर्मट साथीदारांना पण वाचायला सांग.
अत्यंत दुःखी क्रिकेट चाहता

 

Sportsnasha
राजेश देव

SPORTSNASHA
www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.
http://www.sportsnasha.com

2 thoughts on “Respect Seniors

 1. Dear Mr. Deo
  I am agree with you. Respect should be given
  to every seniors.
  whether you like it or not.

  Regards
  Shivam Jadhav.

Comments are closed.