वरळी स्पोर्ट्स क्लब कुमार गट कबड्डी स्पर्धा

 

  सिध्दीप्रभा, विजय क्लब, ओम् ज्ञानदीप यांनी वरळी स्पोर्ट्स क्लब आयोजित नमन ग्रुप पुरस्कृत कुमार गट कबड्डीची दुसरी फेरी गाठली. आदर्श नगर येथील वरळी स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर झालेल्या मुलांच्या सामन्यात प्रभादेवीच्या सिध्दीप्रभाने काळाचौकीच्या साईराजचा ४६-२७ असा पाडाव केला. साईराजने सुरुवात झोकात केली होती. त्यांनी सुरुवाती पासून एक-एक गडी टिपत व पकडी करीत आघाडी आपल्याकडे राखली होती.पण शिलकी तीन व दोन खेळाडूत त्यांना गुण घेणे जमले नाही. सिध्दीप्रभाने पूर्वार्धात पाच अव्वल पकडी करीत सामन्याचा निकालच बदलून टाकला. त्यांनी तीन अव्वल पकडी करीत सामना १०-१०असा बरोबरीत आणला. त्यानंतर आणखी दोन अव्वल पकडी करीत आघाडी घेतली.शेवटी साईराजवर लोण देत सिध्दीप्रभाने २०-११अशी आघाडी घेतली. मध्यांतराला २३-१४अशी त्यांच्याकडे आघाडी होती.विवेक मोरे, ओमकार पवार या विजयाचे शिल्पकार ठरले. ओमकार भोसले, करण सावर्डेकर यांनी साईराज कडून चांगली सुरुवात केली होती, पण पाच अव्वल पकडीने त्यांना पराभवाच्या गर्तेत लोटले.
 
दादरच्या विजय क्लबने लोअर परेलच्या यंग विजयला ३४-१७असे नमविले.पूर्वार्धापर्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या या सामन्यात विजयकडे १३-१०अशी ३गुणांची माफक आघाडी होती.उत्तरार्धात मात्र विजयने जोरदार मुसंडी मारत सामना एकतर्फी केला.त्यांच्या अभिषेक हपकरने जोरदार आक्रमण करीत ,तर अभिषेक रामाणे यांनी भक्कम बचाव करीत सामना आपल्या बाजूने झुकविला. यंग विजयच्या हर्षल भालेकर, साईराज चव्हाण यांनी पूर्वार्धात चांगली लढत दिली. उत्तरार्धात मात्र ते ढेपाळले. ओम् ज्ञानदीपने वारसलेनला ४९-२३ असे पराभूत केले.मध्यांतराला २४-०५अशी १९ गुणांची मोठी आघाडी घेणाऱ्या ज्ञानदीपने नंतरही तोच धडाका कायम राखत हा विजय सोपा केला.राहुल शिरोडकर, ओमकार येणापुरे यांच्या धारदार चढाया,तर अनिकेत घाडीगावकरच्या धाडशी पकडी या विजयात महत्वपूर्ण ठरल्या.वारसलेनचे सोहम व साईराज हे नार्वेकर बंधू चमकले.
सिध्दीप्रभाच्या दोन खेळाडूने साईराजच्या चढाईपट्टूची केलेली यशस्वी अव्वल पकड.(सुपर कॅच)

SPORTSNASHA

www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.

Show Buttons
Hide Buttons