ओम् कबड्डी प्रबोधिनीचे ” उन्हाळी कबड्डी प्रशिक्षण शिबीर” १५मे पासून सुरू

 

ओम् कबड्डी प्रबोधिनी आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने “उन्हाळी कबड्डी प्रशिक्षण ” शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. एल्फिन्स्टन येथील महाराष्ट्र कामगार मंडळाच्या बाबू गेनू क्रीडांगणावर दि.१५मे ते२०मे २०१७ या कालावधीत हे शिबीर घेण्यात येईल. या शिबिरात अर्जुन पुरस्कार माया मेहेर, शिवछत्रपती पुरस्कार शेखर शेट्टी, तारक राऊळ, सिताराम साळुंखे, एन.आय.एस.जीवन पैलकर, राष्ट्रीय खेळाडू शिवाजी भांदीगरे, दया घंदाडे, रमेश लांबे, कृष्णा काताळे, वैशाली सावंत, राजू कवळे आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. वयवर्ष १६वर्षाच्या आतील मुले व मुली या शिबिरात सहभाग घेऊ शकतात.
या शिबिरात सहभागी होण्याकरिता मुला- मुलींनी आपली नोंदणी अनिल नागवेकर भ्रमणध्वनी क्र. ९८९२७२८०८४ यांच्याशी संपर्क साधून दि. १४ मे २०१७ पर्यंत करावी. त्याच बरोबर या शिबिरात सहभागी होणाऱ्या मुला-मुलींनी दि. १५ मे रोजी ठीक ३-३०वाजता आपली हजेरी शिबिरास्थळी राखणे अनिवार्य आहे. असे या पत्रकाव्दारे प्रबोधिनीचे सचिव जीवन पैलकर यांनी केले आहे.

SPORTSNASHA

www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.

Show Buttons
Hide Buttons