T 30 yellow ball tournament
“आम्हाला यलो बॉल क्रिकेट, जे चार बॉल ची ओव्हर ह्या नवीन कन्सेप्ट ने खेळले जाईल असे सामने देशोदेशी लोकप्रिय करायचे आहेत ” झेलस स्पोर्ट्स चे अमित ह्या नवीन प्रकारच्या क्रिकेट बद्दल टूर्नामेंट च्या अंतिम सामन्या नंतर स्पोर्टसनशा शी बोलताना सांगत होते
झेलस स्पोर्ट्स तर्फे नुकतीच T30 क्रिकेट टूर्नामेंट आयोजित करण्यात आली.
ओवल मैदानावर T30 अंतर विद्यालयीन स्पर्धेत दालमिया कॉलेजने पोद्दार कॉलेज माटुंगा चा 5 विकेट्स राखून पराभव केला व हि स्पर्धा जिंकली. दोन दिवस चाललेल्या ह्या स्पर्धेत दहा कॉलेज नी भाग घेतला.
हे चार बॉल ओव्हर चे क्रिकेट गोलनदाज व फलंदाज दोघांनाही समान संधी देते असे मत अंतिम सामन्यात नेतृत्व करणाऱ्या पोद्दार च्या अभिषेक व दलमियाच्या अनिष ह्यांनी व्यक्त केले.
झेलस स्पोर्ट्स चे कालेकर ह्यांनी ह्या क्रिकेटच्या आगळ्या वेगळ्या प्रकारासाठी अथक प्रयत्न केले असून ते हा प्रयोग विविध वयोगटासाठी सुद्धा लोकप्रिय करणार असल्याचे म्हणाल.े