Rhythmic Gymnastic International Tournament – Malaysia
मलेशिया मध्ये २७ एप्रिल २०१७ अखेरमध्ये होणा-या रिदमिक जिन्मॅस्टिक इनव्हिटेशनल स्पर्धेच्या मलेशिया कपमध्ये सहभागी होण्यासाठी प्रिमिअर रिदमिक जिन्मॅस्टिक अकडमीचा मुलींचा ज्युनिअर व सिनिअरचा संघ मलेशियामध्ये जाणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जिन्मॅस्टिक प्रशिक्षका वर्षा उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या जिन्मॅस्टिक संघाच्या खेळाडूंनी राज्याचे क्रिडा मंत्री विनोद तावडे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री. तावडे यांनी जिन्मॅस्टिक संघाला शुभेच्छा दिल्या.