
तुर्कमेनीस्तान मध्ये २४ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान होणा-या एशियन किक बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ सहभागी होत आहे. महाराष्ट्रातून २० खेळाडूंचा संघ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार असून संघाचे खेळाडू आणि प्रशिक्षकाने आज क्रिडा मंत्री श्री. विनोद तावडे यांची सदिच्छा भेट घेतली. श्री. तावडे यांनी किक बॉक्सिंगच्या संघाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.