राज्य निमंत्रीत साखळी क्रिकेट स्पर्धेचा धावफलक पहायला मिळणार मोबाईल वर, क्रिकहिरोज अॅपद्वारे लाईव ✍स्कोरींग

 

महाराष्ट्र क्रिकेट संघटना आयोजित १९ वर्षाखालील मुलांच्या आमंत्रित साखळी क्रिकेट स्पर्धा दि.२४ एप्रिल पासून सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेच्या नियोजनाखाली सोलापूरात होणार असून एकूण १० सामने पार्क स्टेडीयम व रेल्वे मैदानावर पार पडणार आहेत.

क गटाच्या या प्रत्येकी २ दिवसीय १५ सामन्यांपैकी सोलापूरात होणा-या १० सामन्यांचे गुणलेखन (Scoring✍) प्रथमच मोबाईल ?अॅपद्वारे केले जाणार असून Cricheroes हे अॅप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करुन install केल्यास एका क्लिक वर सामन्यांचा चालू स्कोर पहायला मिळणार आहे. राज्य क्रिकेट स्पर्धेसाठी असे अॅप वापरण्याची व live score पहायला मिळायची ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे व ते शक्य होतेय सोलापूरच्या क्रिकेट संघटनांमुळे…????

सोलापूरात होणा-या दोन्ही मैदानावर चालू असलेल्या सामन्यांचा live score, photos, सांख्यिकी माहिती इ. ह्या app द्वारे सगळ्यांना मिळणार असून हे अॅप Google play store वरुन मोफत download करता येते.

SPORTSNASHA

www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.

Show Buttons
Hide Buttons