बजरंग “सुवर्ण चषक” कबड्डी स्पर्धेत जवळपास ५ लाख रुपयांच्या बक्षिसांची खैरात!
स्पर्धेत सर्वोत्तम ठरणाऱ्या खेळाडूला मिळणार “मोटरबाईक”!
बजरंग क्रीडा मंडळ आपल्या सात दशकाच्या (७०वर्ष)पूर्ततेनिमित्त राज्यस्तरीय स्थानिक पुरुष गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करीत आहे.महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. व मुंबई शहर कबड्डी असो. च्या मान्यतेने दि. ६एप्रिल ते ९एप्रिल २०१७ या कालावधीत त्या खेळविण्यात येतील.ना.म.जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे होणाऱ्या या कबड्डी स्पर्धेत मुंबई शहर,मुंबई उपनगर ,ठाणे, पुणे, सांगली, कोल्हापूर, नंदुरबार या जिल्ह्यातून २१ संघांना निमंत्रित करण्यात आले आहे. या २१ संघाची सात गटात विभागणी करण्यात येईल. सायं.च्या सत्रात प्रखर विद्युत झोतात दोन क्रीडांगणावर हे सामने खेळविले जातील.आकर्षक आणि मोठ्या रकमेच्या पारितोषिकांचा ही स्पर्धा असल्यामुळे निलेश शिंदे, निलेश साळुंखे, बाजीराव होडगे, गिरीश ईरनाक, तुषार पाटील, सुलतान डांगे, प्रशांत चव्हाण हे प्रो-काबड्डीतील स्टार या स्पर्धेत आपल्या स्थानिक संघातून खेळणार आहेत.
१५लाख रुपये अंदाज पत्रक असलेल्या या स्पर्धेत विजयी होणाऱ्या संघास रोख ₹१,००,०००/- (रु. एक लाख ) व “बजरंग सुवर्ण चषक” प्रदान करण्यात येईल.उपविजयी संघाला रोख ₹५१,०००/- (रु. एकावन्न हजार) व आकर्षक चषक देण्यात येईल. त्याशिवाय विजयी व उपविजयी संघातील १२-१२ खेळाडूंना आकर्षक पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल. तृतीय व चतुर्थ क्रमांकाच्या संघांना चषक व अनुक्रमे रोख ₹ २५,०००/- व ₹१५,०००/- प्रदान करण्यात येतील. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूस मिळणार “मोटारबाईक ” ! स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई व पकडीच्या खेळाडूस प्रत्येकी रोख ₹ २५,०००/- (रु.२५,०००/-) देऊन गौरविण्यात येईल. प्रतिदिनीचा मानकरी ठरणाऱ्या खेळाडूचा रोख ₹५,०००/- (रु. पाच हजार) देऊन सन्मान करण्यात येईल. एवढी मोठी स्पर्धा यशस्वी करणे म्हणजे तारेवरची कसरतच. स्पर्धेच्या आयोजनात कोणतीही कसर राहू नये व खेळाडूंना काही कमी पडू नये म्हणून कार्याध्यक्ष अरविंद शिंदे, सरचिटणीस मिलिंद सावंत, स्पर्धा प्रमुख सुभाष साईल व सुधीर शिंदे जातीने लक्ष देत आहेत. स्पर्धेची तयारी जोरदार सुरू आहे.
अधिक माहिती करिता स्पर्धा प्रमुख सुभाष साईल ९८६९३९४३८०.