आयडॉलमध्ये प्रथमच क्रीडा स्पर्धा संपन्न

 

मुंबई :  मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेमध्ये विद्यार्थी व कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. आयडॉलच्या वर्धापनदिनानिमित्त यावर्षी प्रथमच क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आयडॉलचे विद्यार्थी हे सहसा नोकरी करणारे असतात. यातील अनेक विद्यार्थ्यांना विविध खेळांची आवड असते. परंतु नोकरीमुळे व इतर कारणामुळे इच्छा असूनही खेळता येत नव्हते.  विशेषतः राष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडू आयडॉलमध्ये विविध अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतात.  अशा खेळामध्ये आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रथमच क्रीडा स्पर्धा नुकत्याच  आयोजित करण्यात  आल्या होत्या.  या क्रीडा स्पर्धा विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाच्या सहकार्याने आयोजित केल्या गेल्या.

या क्रीडा स्पर्धांमध्ये मुख्यतः व्हॉलीबॉल, रस्सीखेच, बॉल फेकणे, इनडोअर खेळांमध्ये बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम, टेबल टेनिस तसेच एथलेटिक्स खेळांमध्ये १००/२००/४०० मीटर्स धावणे, गोळाफेक, उंच उडी, रिले ४ x १०० मि., भालाफेक यांचा समावेश होता.  या स्पर्धेमध्ये विविध खेळांमध्ये १०५ विद्यार्थी व ७५ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.    

या स्पर्धांमध्ये रस्सीखेच  खेळामध्ये आशुतोष पांडे यांचा संघ पुरुषांमध्ये तसेच नूर हीना यांचा संघ स्त्रियांमध्ये प्रथम ठरले.  कॅरम खेळामध्ये विद्यार्थ्यांमध्ये नूर हीना स्त्रियांमध्ये तसेच कर्मचाऱ्यांमध्ये पुरुषांमध्ये अविनाश तांबे, अमित जाधव व संदीप कांबळे यांनी प्रथम पारितोषिक मिळविले. बॅडमिंटन खेळामध्ये विद्यार्थ्यांमध्ये शीतल राजपूत स्त्रियांमध्ये व अंकित शेट्ये यांनी पुरुष स्पर्धकांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला तसेच कर्मचाऱ्यांमध्ये सागर सकपाळ व मंजुश्री गावंडे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. १०० मीटर, २०० मीटर व ४०० मीटर धावण्यामध्ये दिजांग लामकामसन, शामराव शिंदे, ओमकार तावडे पुरुषांमध्ये व श्रुतिका मालसुरे, कर्मऱ्यांमध्ये अभिजीत इक्के, नागराज शिंदे, सुषमा झडे, संदीप पेटारे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. रिले ४ x १०० या स्पर्धेमध्ये संदीप पेटारे व कविता सरोज यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. बुद्धिबळ खेळामध्ये कल्पेश शाह, श्रुतिका, दर्शना तांबे, निलेश तेजाळे यांनी  प्रथम क्रमांक मिळविला.  भालाफेक खेळामध्ये जयेश लिमये, नेहा वाघ, प्रकाश कांबळे, सुषमा झडे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.  गोळाफेक खेळामध्ये नेहा वाघ, दिजांग लामकामसन, सागर पवार व उमा कदम यांनी प्रथम क्रमांक मिळविला.  व्हॉलीबॉल खेळामध्ये आलम शेख व दिजांग लामकामसन यांनी प्रथम क्रमांक मिळविला. टेबल टेनिस स्पर्ध्येमध्ये  अभिजीत इक्के यानी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. या सर्व स्पर्धकांना शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालिका डॉ. कादिरावन व संस्थेच्या संचालिका डॉ. अंबुजा साळगावकर यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.

SPORTSNASHA

www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.

Show Buttons
Hide Buttons