३ री मृणालताई गोरे व प. बा. सामंत स्मृती महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धा २०१६-१७
मुंबईच्या संदीप व स्नेहाला प्रथम मानांकन केशव गोरे स्मारक ट्रस्टच्यावतीने ३ री मृणालताई गोरे व प. बा. सामंत स्मृती महाराष्ट्र राज्य मानांकन स्पर्धा शुक्रवार दिनांक २४ मार्च २०१७ रोजी सकाळी ९ वाजता केशव गोरे स्मारक ट्रस्ट, गोरेगाव येथे सुरु होत आहे. सलग ४ दिवस सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेतील पुरुष एकेरी गटात एकंदर ३६२ तर महिला एकेरी गटात ४० खेळाडूंनी भाग घेतला आहे. पुरुष गटात मुंबईच्या संदीप देवरूखकरला तर महिला गटात मुंबईच्याच स्नेहा मोरेला प्रथम मानांकन देण्यात आले आहे. सलग ३ ऱ्या वर्षी केशव गोरे स्मारक ट्र्स्टच्यावतीने ही स्पर्धा होत असून विजेत्या खेळाडूंना तब्बल ८० हजारांची रोख पारितोषिके आणि मृणालताई गोरे व प. बा. सामंत चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.स्पर्धेची मानांकन पुढील प्रमाणेपुरुष एकेरी१) संदीप देवरुखकर ( मुंबई ) २) योगेश धोंगडे ( मुंबई ) ३) योगेश परदेशी ( पुणे ) ४) महम्मद गुफरान ( मुंबई ) ५) महम्मद साजिद खान ( मुंबई ) ६) संदीप दिवे ( मुंबई उपनगर ) ७) पंकज पवार ( मुंबई )८) अनिल मुंढे ( पुणे )महिला एकेरी१) स्नेहा मोरे ( मुंबई ) २) मेधा मठकरी ( पुणे ) ३) प्रिती खेडेकर ( मुंबई ) ४) मैत्रेयी गोगटे ( मुंबई ) ५) मिताली पिंपळे (पालघर ) ६) सुमेधा जाधव ( मुंबई ) ७) अनुपमा केदार ( मुंबई ) ८) मीनल लेले खरे ( ठाणे )