लाजिरवाणा पराभव …द्वारकानाथ संझगिरी

 

पुण्याच्या खेळपट्टीची ठेच विराटकोहलीच्या संघाला जोरदार लागली. पराभवाचेरक्त भळभळा वाहिलं.  आता प्रश्न एवढाच आहेकी, त्यातून आपण शहाणपण शिकणार का?

का आणि कुणाला अवदसा आठवली अशीपहिल्या दिवसापासून फिरणारी खेळपट्टीकरण्याची? चेंडू  नुसता  फिरत नव्हता,उसळतही होता. शेन वॉर्नने पाहताक्षणीसांगितलं, 250 धावांची खेळपट्टी आहे. तोखेळत असता तर तीच खेळपट्टी 150धावांची झाली असती. विराटला काय देवानेवर दिलाय प्रत्येक वेळी टॉस जिंकून बॅटिंगघेण्याचा? मग का, का, आपण पायावरकुऱहाड सॉरी…  ओकिफ मारून घेतला?

गेल्या नऊ कसोटींत (न्यूझीलंडऔइंग्लंडऔबांगलादेश) आपण ‘दादा’सारखेजिंकलो. त्यावेळी  खेळपट्टय़ा सुबुद्धपणेतयार केल्या होत्या. त्या फिरायच्या, पणशेवटच्या दोन दिवशी. त्यामुळे  हिंदुस्थानीफलंदाजांच्या धावा व्हायच्या आणि ते दोनदिवस अश्विन -जाडेजाला फिरकीचं जाळंटाकायला पुरायचे. हा डावपेच आपण काबदलला?

ऑस्ट्रेलियाला घाबरून? की हाऑस्ट्रेलियन संघ हा ढेकूण आहे. त्यालाआरामात चिरडून टाकू असं  आपल्या ‘ब्रेनट्रस्ट’ला वाटलं. किंबहुना, ऑस्ट्रेलियन संघ हाअसा संघ आहे की, पराभवाच्या  कडय़ावरएका हाताने लटकत असताना प्रतिस्पर्ध्यालादुसऱया हाताने खाली फेकून देण्याचा आधीविचार करतो. मग स्वतःला  वाचवायचा. हाऑस्ट्रेलियन संघ तसा नवखा आहे. तोहिंदुस्थानी दौऱयासाठी तयारी करीत होता त्यावेळी मी ऑस्ट्रेलियात होतो. त्यांच्यातयारीबद्दल मी वाचत होतो. फक्त वेगवानगोलंदाजांनी आपल्याला  जिंकता येणार नाही.फिरकी गोलंदाजांची मदत लागणार हे त्यांनीताडलं आणि त्याप्रमाणे श्रीराम,  मॉण्टी पानेसरयांची मदत घेतली आणि आखणी करून तेमैदानात उतरले.

दुसरी गोष्ट, आपण फिरणाऱया खेळपट्टीवरफिरकी गोलंदाजी चांगली खेळतो ही अंधश्रद्धाआहे. ती  परंपरेतून  चालत आलीय. विजयहजारे, विजय मांजरेकर, बोर्डे चांगले खेळत.सुनील गावसकर, वेंगसरकर,  सचिनतेंडुलकरही चांगले खेळत, पण आजोबा आणिनंतर मुलांच्या पिढीपर्यंत हे ठीक होतं.नातवात ते  गुण उतरलेले नाहीत. कारणआजोबा, मुले ही फिरणाऱया खेळपट्टीवरउत्तम फिरकी गोलंदाजांच्या  खुराकावरवाढली.  नातवांची पिढी ही वन डे, टी-20च्यासंस्कृतीत. चांगल्या खेळपट्टय़ांच्या आणिदोन-चार अपवाद वगळता सुमार फिरकीगोलंदाजांच्या खुराकावर वाढली. त्यामुळेचांगल्या खेळपट्टीवर याच  ओकिफला तेफेकून देतील; पण चेंडू फिरला, उसळला,आजूबाजूला क्षेत्ररक्षकांचा फास आवळलागेला की त्यांचं ग्यानबा-तुकाराम सुरू होतं.बचाव करताना चेंडू जमिनीलगत ठेवणं कठीणजातं. एखादा सेहवाग होता, जो  कुठल्याहीखेळपट्टीवर वादळ उभं करायचा, पण तोदेवाचा ‘डिझायनर्स आयटेम’ होता. बरं गंमतम्हण,  ओ’किफने चेंडू वळवला कुठे? सरळचेंडूवर तर बळी घेतले. हिंदुस्थानी फलंदाजचेंडू वळणार म्हणून  खेळले  आणि फसले.

1987 च्या पाकिस्तानविरुद्धची सुनीलगावसकरची 96 धावांची खेळी ही मी खराबखेळपट्टीच्या फलंदाजीचं  सर्वोत्कृष्टप्रात्यक्षिक मानतो. त्यापेक्षा चांगलं फक्तपरमेश्वर खेळू शकला असता. त्यावेळीपाकिस्तानचा  डावखुरा फिरकी गोलंदाजइक्बाल कासीमला बेदीने टीप्स दिल्या.त्याप्रमाणे कासीमने त्या खेळपट्टीवर  चेंडूवळवण्यापेक्षा सरळ टाकण्यावर किंवा कमीवळवण्यावर भर दिला. ओ’किफने नेमकं तेचकेलं.  जाडेजा  चेंडू वळवत राहिला. फलंदाजबिट होत राहिले, पण बाद झाले नाहीत.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ऑस्ट्रेलियनफलंदाज आपल्यापेक्षा जास्त चांगले खेळले.जास्त  आक्रमकपणे  खेळले. ऑस्ट्रेलियनफलंदाज ही अशी जमात आहे की, जी पॉपिंग क्रिझची मर्यादा झुगारायची परंपरा  पाळते. 1956 साली ऑस्ट्रेलियाचा नील हार्वे बॅटिंगला आला. त्यावेळी सुभाष गुप्ते जगातला सर्वोत्कृष्ट लेगस्पिनर होता. हार्वेने यष्टिरक्षक ताम्हाणेला सांगितले, ‘हा तुमचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. त्याने माझ्यावर हल्लाकरण्यापूर्वी मी त्याच्यावर हल्ला करेन.’  हार्वेने शतक ठोकले. 1969 सालीप्रसन्ना-बेदी-वेंकटसमोर मद्रासच्याआखाडय़ात ऑस्ट्रेलियाची अवस्था 6 बाद21 होती. टेडपाथने पुढे सरसावत  त्यांचासमाचार घेतला आणि कसोटी जिंकली.ऑस्ट्रेलियाच्या स्मिथनेही तेच केले. तो पुढेसरसावला,  झुंजला. त्याने अश्विनला गोंधळवूनटाकलं. आणि हो, स्टार्कच्या दोन खेळी  आणि पुजार कोहलीच्या विकेटस्ही महत्त्वाच्याहोत्या.

इथून हिंदुस्थानी संघ कसा उठून उभा राहतोते मला पाहायला आवडेल. त्याची खात्री आहे,पण ते सोप्पं नाही.

SPORTSNASHA

www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.

Show Buttons
Hide Buttons