District carrom championship

कै प्रदीप जाधव याच्या स्मरणार्थ बँक ऑफ इंडिया, भारतीय आयुर्विमा महामंडळ व बँक ऑफ महाराष्ट्र पुरस्कृत २६ व्या मुंबई जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेला लालबागच्या हनुमान थिएटर मंगल कार्यालय येथे आज सुरुवात झाली. सांघिक गटाच्या ब गटात खेळताना पहिल्याच सामन्यात रिझर्व्ह बँकेच्या विश्व विजेत्या प्रशांत मोरेने मस्पर्धेतील पहिल्या ब्रेक टू फिनिशची नोंद केली. त्याच्या व हिदायत अन्सारीच्या जोरावर रिझर्व्ह बँकेने माझगाव डॉक बी संघाला २-१ असे हरविले. तत्पूर्वी महाराष्ट्र क्रीडा खात्याचे उप संचालक बी एन मोठे यांच्या हस्ते स्पर्धेचे शानदार उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून पुरस्कर्त्या बँक ऑफ महाराष्ट्राचे सहाय्यक महाव्यवस्थापक प्रफुल्ल सोमण व अतुल जोशी उपस्थित होते. मुंबई जिल्हा कॅरम संघटनेचे अध्यक्ष प्रदीप मयेकर व मानद सचिव यतीन ठाकूर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. उपाध्यक्ष अरुण केदार यांनी स्पर्धेबाबत माहिती दिली.सांघिक गटात ४९ संघानी भाग घेतला आहे.
स्पर्धेचे इतर निकाल पुढीलप्रमाणे
आंतर संस्था ब गट
रिझर्व्ह बँक विजयी विरूद्ध माझगाव डॉक बी सांग २-१
आयकर विजयी विरूद्ध सचिवालय जिमखाना ३-०
बी इ एस टी अ संघ विजयी विरूध्द इंडियन ऑइल २-१
आंतर संस्था क गट
बी इ  एस टी बी संघ विजयी विरुद्ध माझगाव डॉक क संघ ३-०
मुंबई पोर्ट ट्रस्ट बी संघ विजयी विरुद्ध पी ओ आर सी २-१
SPORTSNASHA
www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.
http://www.sportsnasha.com