CRICKET WITH DWARKANATH SANZGIRI

हिंदुस्थानने उभारली विजयाची गुढी
द्वारकानाथ संझगिरी
हिंदू आणि विशेषतः मराठी नववर्षाच्या दिवशी एकामराठी तरुणाने हिंदुस्थानी क्रिकेट पदशाहीला एक मोठाविजय
 मिळवून देऊन विजयाची गुढी उभारली.अजिंक्य रहाणे पहिल्याच कसोटीत ‘अजिंक्य’ ठरला.हिंदुस्थानी क्रिकेट
रसिकांच्या हृदयात हा विजयशिलालेखासारखा कोरलेला ‘राहणार’ यात शंका नाही.
ऑस्ट्रेलियन संघ हिंदुस्थानात आला तेव्हा त्यांच्याकडे ‘एटीम किस चिडीया का नाम है’ असं बघितलं गेलं.
पहिल्याच कसोटीत त्या चिमणीचा गरुड झाला आणिहिंदुस्थानी संघ हरला. दुसऱया कसोटीत आपणत्यांच्यावर डाव पलटवला.
तिसरी कसोटी त्यांनीअनिर्णीत राखली. त्यामुळे चौथी कसोटी ही ‘इस पार याउस पार’ या धाटाची होती. त्यात विराट कोहली नव्हता.
मैदानावरचं शाब्दिक द्वंद्व हे वात पेटलेल्याऍटमबॉम्बसारखं वाटत होतं. धर्मशाला थंड असलं तरीहीहा ऍटमबॉम्ब कधीही फुटेल असं
वातावरण होतं. अशावेळी ज्या प्रकारच्या नेतृत्वाची गरज होती तसं नेतृत्वअजिंक्य रहाणेनं केलं. मैदानाकडे दिमाखात
 पाहणाऱयाहिमालयाच्या बर्फांच्या शिखरांनाही रहाणेच्या शांत सयंतथंडपणाचा हेवा वाटला असेल. पण तो बचावात्मकहोता.
ना त्याची बॅट बचावात्मक होती ना नेतृत्व!
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आणि लंचपर्यंत 1 बाद 131पर्यंत अशी घोडदौड केली. तेव्हा स्वर्गातून राघोबादादांनीही विस्मयाने
पाहावं अशी ती ‘स्मिथोभरारी’ होती.पण शांत रहाणे डगमगला नाही. त्याच्या हातात कुंबळे-विराटने जे नवशस्त्र्ा दिलं होतं त्याचा त्याने सुंदरउपयोग केला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणा केली, योग्य वेळीगोलंदाजीत बदल केले
आणि अटकेकडे निघालेलीस्मिथची फौज दिल्लीलाही पोहोचली नाही. स्मिथने खासदलाई लामाचा आशीर्वाद घेतला होता.
दलाई लामाच्याशहरात एका ‘चायनामन’ने धुडगूस घातला. कुलदीपयादव हा पूर्वी येणाऱया तारेसारखा (टेलिग्राम) ठरला.
पूर्वी घरी तार आली की ती थरथरत्या हाताने फोडलीजाई. बातमी आनंदाची की दुःखाची? नातू झाला कीआजोबा झाला?
कुलदीप यादव नावाची तारउघडल्याक्षणी एका गुणवान नातवाचा जन्म झाल्याचीबातमी कळली. तो मास्टर स्ट्रोक होता.
अचानकऑस्ट्रेलियन संघ एका वेगळय़ा गोलंदाजाला सामोरागेला. त्यांनी इतिहासाचा अभ्यास केलेला आणि समोरभूगोलाचा
 पेपर आला. त्यामुळे त्यांना तो पहिल्या डावातजड गेला. तो अधिक कठीण करण्याचं काम अजिंक्यच्यायोग्य क्षेत्ररचनेने केलं.
कुलदीय यादव हुकमाचं पान बनलं कारण खेळपट्टीतबाऊन्स होता. तो मनगटाने चेंडू टाकताना त्याला प्रचंडफिरत (रेव्होल्यूशन)  देतो.
 जी गोष्ट नाथन लायन करतो.त्यामुळे त्याला टर्न आणि बाऊन्स मिळाला. त्यात त्यानेगुगली आणि चायनामन विस्कीत सोडा मिसळावा
 तसामिसळला. ती नशा ऑस्ट्रेलियन फलंदाजांना झेपलीनाही.
पहिल्या डावात हिंदुस्थानी संघाला 32 धावांची आघाडीमिळाली. त्यात राहुल, पुजारा, रहाणेचा वाटेल असेल,पण रिले शर्यतीत
शेवटचा धावणारा हा जास्त महत्त्वाचाठरतो तसा रवींद्र जाडेजा महत्त्वाचा ठरला. हिंदुस्थानीखेळपट्टय़ांवर आपण उत्कृष्ट अष्टपैलू
खेळाडू आहोत हेत्याने दाखवून दिलं. त्याने बचाव व्यवस्थित केला पणसंधी मिळाली तेव्हा आक्रमणही केलं. हा गनिमी
कावाफायदेशीरही ठरला.
हिंदुस्थानची 32 धावांची आघाडी ही तुटपुंजी नाही हेउमेश यादवच्या स्पेलने सिद्ध केलं. काय स्पेल होता!अचानक खेळपट्टीच रूपांतर ज्वालामुखीत झाल्यासारखंवाटलं. उसळत्या चेंडूच्या साम्राज्यातले सरदार भेदरले.
कुणी कोसळतोय, कुणी मान तुकवतोय तर कुणीपळतोय! हिंदुस्थानी क्रिकेटसाठी हे स्वप्नवत होतं. हे दृश्यबघताना
स्वतःला चिमटे काढून घेऊन घेऊन माझ्याअंगावर वळ उठले. त्याचा टप्पा आणि दिशेची अचूकताकेवढी तरी मोठी होती.
वर्षापूर्वी तो एक चेंडू माहीमलाआणि दुसरा चेंडू माटुंग्याला टाकायचा. अचानकअर्जुनाला हेवा वाटावा अशी अचूकता त्याने
 आणलीकुठून?
एकेकाळी मुलायम-लालूच्या सैरभैर राजकीयकुळातला वाटणारा उमेश आता श्रीकृष्णातल्या अस्सलकुळातला वाटायला लागलाय.
त्यामुळे फिरकीगोलंदाजाचं काम ऑस्ट्रेलियाच्या दुसऱया डावात सोपंझालं. कुलदीप यादवचा करिष्मा दुसऱया डावात चालतनाही हे
पाहिल्यावर रहाणेने जाडेजा, अश्विन या संताजीधनाजीच्या जोडीवर उर्वरित ऑस्ट्रेलियन डाव साफकरण्याची कामगिरी सोपवली.
दुसऱया डावात 105धावांचा पाठलाग ही हिंदुस्थानसाठी तब्येतीतजेवल्यानंतरची शतपावली होती. राहुलने पुन्हा एकदापाया घातला.
या पोरानं शिखर धवनला अडगळीतटाकलंय. फक्त पुन्हा 50 धावा करून तो बाद झाला तरत्याला 50 मिनिटे ड्रेसिंग रूमबाहेर
 उभं करावं. विजयाचंशिखर सर करताना रहाणेची बॅट पण तळपली. हेविजयाच्या केकवरचं आयसिंग होतं.

SPORTSNASHA

www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.

Show Buttons
Hide Buttons