CRICKET WITH DWARKANATH SANZGIRI

हिंदुस्थानने उभारली विजयाची गुढी द्वारकानाथ संझगिरी हिंदू आणि विशेषतः मराठी नववर्षाच्या दिवशी एकामराठी तरुणाने हिंदुस्थानी क्रिकेट पदशाहीला एक मोठाविजय  मिळवून देऊन विजयाची गुढी उभारली.अजिंक्य रहाणे पहिल्याच कसोटीत ‘अजिंक्य’ ठरला.हिंदुस्थानी क्रिकेट रसिकांच्या हृदयात हा विजयशिलालेखासारखा कोरलेला ‘राहणार’ यात शंका नाही. ऑस्ट्रेलियन संघ हिंदुस्थानात आला तेव्हा त्यांच्याकडे ‘एटीम किस चिडीया का नाम है’ असं बघितलं गेलं. पहिल्याच कसोटीत त्या चिमणीचा गरुड झाला आणिहिंदुस्थानी संघ हरला. दुसऱया कसोटीत आपणत्यांच्यावर डाव पलटवला. तिसरी कसोटी त्यांनीअनिर्णीत राखली. त्यामुळे चौथी कसोटी ही ‘इस पार याउस पार’ या धाटाची होती. त्यात विराट कोहली नव्हता. मैदानावरचं शाब्दिक द्वंद्व हे वात पेटलेल्याऍटमबॉम्बसारखं वाटत होतं. धर्मशाला थंड असलं तरीहीहा ऍटमबॉम्ब कधीही फुटेल असं वातावरण होतं. अशावेळी ज्या प्रकारच्या नेतृत्वाची गरज होती तसं नेतृत्वअजिंक्य रहाणेनं केलं. मैदानाकडे दिमाखात  पाहणाऱयाहिमालयाच्या बर्फांच्या शिखरांनाही रहाणेच्या शांत सयंतथंडपणाचा हेवा वाटला असेल. पण तो बचावात्मकहोता. ना त्याची बॅट बचावात्मक होती ना नेतृत्व! ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आणि लंचपर्यंत 1 बाद 131पर्यंत अशी घोडदौड केली. तेव्हा स्वर्गातून राघोबादादांनीही विस्मयाने पाहावं अशी ती ‘स्मिथोभरारी’ होती.पण शांत रहाणे डगमगला नाही. त्याच्या हातात कुंबळे-विराटने जे नवशस्त्र्ा दिलं होतं त्याचा त्याने सुंदरउपयोग केला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणा केली, योग्य वेळीगोलंदाजीत बदल केले आणि अटकेकडे निघालेलीस्मिथची फौज दिल्लीलाही पोहोचली नाही. स्मिथने खासदलाई लामाचा आशीर्वाद घेतला होता. दलाई लामाच्याशहरात एका ‘चायनामन’ने धुडगूस घातला. कुलदीपयादव हा पूर्वी येणाऱया तारेसारखा (टेलिग्राम) ठरला. पूर्वी घरी तार आली की ती थरथरत्या हाताने फोडलीजाई. बातमी आनंदाची की दुःखाची? नातू झाला कीआजोबा झाला? कुलदीप यादव नावाची तारउघडल्याक्षणी एका गुणवान नातवाचा जन्म झाल्याचीबातमी कळली. तो मास्टर स्ट्रोक होता. अचानकऑस्ट्रेलियन संघ एका वेगळय़ा गोलंदाजाला सामोरागेला. त्यांनी इतिहासाचा अभ्यास केलेला आणि समोरभूगोलाचा  पेपर आला. त्यामुळे त्यांना तो पहिल्या डावातजड गेला. तो अधिक कठीण करण्याचं काम अजिंक्यच्यायोग्य क्षेत्ररचनेने केलं.

Read more
Show Buttons
Hide Buttons